तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

सेनगाव तालुक्यातील साखरा हत्ता कापडशिंगि कोरोना व्हायरस वर खबरदारी म्हनून जनता कर्फ्यू चे पालन तर पूर्ण बाजारपेठ बंद.

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


 संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचाच एक भाग म्हणून, नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात 21 आणि 22 मार्च रोजी सेनगाव तालुक्यातील साखरा हत्ता कापडशिंगि  ग्रामपंचायत आणि  महसूल विभागातील तलाठी  पोलिस पाटील  व सेनगाव  पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी    जनतेला आवाहन केले बाहेर गावाहून तसेच  पुणे  मुंबई नाशिक  आणि  इतर ठिकाणाहून  गावाकडे येणार्या ग्रामस्थांने आपली ओळख आणि  आरोग्य विभाग येथे जाऊन  नोंद करायची आहे व तपासणी करून घेतली जावी असे आवाहन यावेळी  साखरा  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांनी सकाळी
जनतेला आवाहन केळे  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.याचेच काटेकोर पालन करीत आज आज साखरा येथील बाजार  बंदला चागला प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानें बंद ठेवण्यात आली आहेत. तर याबाबत पोलिसांनी आज गस्त घालत दुकाने बंद ठेवण्या संबंधि सूचनाही दिल्या होत्या. बंद असल्यामुळे साखरा हत्ता कापडशिंगि येथील  सर्व रस्ते ओसं पडले आहेत.तर पोलीस देखील रस्त्यावर गस्त घालत बंदवर लक्ष ठेऊन आहेत.तर काही गावातील नागरिकांनी या बंद मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यातील विविध विभागातील नागरिकांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून सहकार्य केले असे  जिल्हाअधिकारी  यांनी दिलेल्या सर्वच सूचनाचे पालन केले आहेंतेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment