तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

अंभोरे यांच्या निधनाबद्दल धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले दुःख


कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय सेवानिवृत्त अधिकारी हरवला


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :-
मराठवाड्याचे विकासतीर्थ म्हणून ख्याती पावलेल्या परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला प्रगतीच्या मार्गावर नेवून केंद्राचे नावलौकीक वाढविणारे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी हरवले या शब्दात वीज केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता एम.आर.अंभोरे यांच्या निधनाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात एम.आर.अंभोरे परळी वीज केंद्राचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. वीज केंद्रातील सर्व वीजनिर्मिती संच अखंडपणे चालावेत, त्यातून विक्रमी वीज निर्मिती व्हावी, कोळसा, इंधन तेल व पाण्याचा काटकसरीने वापर करून पर्यावरण संतुलन राखत वीज केंद्राचे नावलौकीक वाढविण्याचे काम श्री अंभोरे यांनी आपल्या कारकीर्दीत केले. ते कडक व शिस्तप्रिय अधिकारी असले तरी सर्व कर्मचार्‍यांत मिळून मिसळून राहून त्यांनी आपले कार्य पार पाडले. त्यांचा वीज केंद्रात विशेष दारारा होता. वीज केंद्रातील सर्व विभागातील दैनंदिन कामाला त्यांनी एक शिस्त लावली होती. त्यांच्या काळात भ्रष्टाचाराला थारा नव्हता, श्री अंभोरे यांचा त्याकाळी प्रभाव होता. त्यामुळे परळी वीज केंद्रापासून मुंबईच्या कार्यालयापर्यंत त्यांना मानणारे अनेक अधिकारी,कर्मचारी होते. अंभोरे यांनी आपल्या कामातून एक आदर्श घालून दिला. त्यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय सेवानिवृत्त अधिकारी हरवला अशा शोकभावना ना.मुंडे यांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment