तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

घराबाहेर पडू नका, सहभाग नोंदवा :- आमदार लक्ष्मण पवार
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २१ _ जन हितासाठीच शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, काळजी घ्या, सहजतेने घेऊ नका, घराबाहेर पडू नका, तुमच्या सहकार्य शिवाय महामारीचा सामना करता येणार नाही,  कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे. दरम्यान  शासनाच्या आदेशानुसार कर्मचार्‍यांनी कार्यरत राहावे अशी सूचनाही त्यांनी केली असून, हलगर्जीपणा उघड झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल असा इशारा दिला आहे. 
         गेवराई येथील नगर परिषदेच्या सभागृहात शनिवारी दि. २१ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार धोडिबा गायकवाड, पोनि. पुरूषोत्तम चोबे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ राजेश शिंदे, डाॅ. नोमाणी महमंद, विद्युत वितरण कंपनीचे शिवलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम, गट शिक्षणाधिकारी व्हि.एन. राठोड, गटविकास अधिकारी बागुल, पो.का. खटाने, तहसिल कार्यालयाचे लिपिक अंकुश सुतार, आंधळे सर, स्वच्छता विभागाचे भागवत येवले, पाणीपुरवठा विभागाचे लाड यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार पवार यांनी सांगितले की, कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी शासन स्तरावरून निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी मतदार संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, ग्रामीण भागातील बाजार भरत असल्याची माहिती आहे. याची पंचायत स्तरावर दखल घेतली पाहिजे. नसता,  परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आटोक्यात येणार नाही. तसे झाले तर, सगळी जबाबदारी बीडीओ यांची असल्याचे सांगून, नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात रविवार, दि. २२ रोजी शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठा साडेसहा वाजे पर्यंत संपलेला पाहिजे, अशा कडक सूचना आमदार पवार यांनी  दिल्या. पी आय चोबे यांनी सांगितले की, तालुक्यातील हाॅटेल, बार बंद ठेवून हाॅटेल मालकांनी सहकार्य करावे, नसता कारवाई करावी लागेल. पोलीस कर्मचारी दिवस रात्र गस्तीवर असून, चेकींग केली जात असल्याची माहिती सांगून, ग्रामीण भागात ग्रामसेवक पोहोचत नाही, त्यामुळे गावात काय चाललय कळायला मार्ग नाही, म्हणून अडचणी येत असल्याची तक्रार यावेळी बैठकीत बोलताना केली आहे.  
        काही नागरिक शहरातून गेवराई तालुक्यातील विविध भागात आपल्या गावी येत आहेत, मात्र गावकरी त्यांना गावात घेत नाहीत, अशा घटना योग्य नाहीत. बाहेरून आलेल्या लोकांना भिऊ नका, आरोग्य विभाग सज्ज आहे. ताप, सर्दी, खोकला झाला असेल तर सांगा, आम्ही तयार आहोत, परंतू, अफवांना बळी पडू नका असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राजेश शिंदे यांनी केले आहे. तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संपर्क राहावा, यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून, त्याची जबाबदारी जाधवर यांच्याकडे देण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment