तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी जपली माणुसकी ; गरजुंना जागेवर दिले अन्नपाणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाँकडाऊन करण्यात आले आहे. गोरगरिबांना यांच्या जेवनामुळे उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करतांना वयोवृद्ध व्यक्तीं उपाशी असल्याचे आढळले त्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्यामुळे पोलिसांचे सामान्य न्यांना माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले. 

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील २१ दिवस अख्खा देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. पण लोकांनी २१ दिवस घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी आहे. बाकीच्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशाप्रकारे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे..कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज पासून लॉक डाऊनचा दुसरा दिवस आहे. अश्या परिस्थितीत तमाम जनतेने आपल्या घरांची दारे ही बंद केली आहे अश्यात ज्यांना घरे नाहीत त्यांच्या साठी मंदिराच्या पायऱ्याच सहारा असतात मात्र अध्या देऊळ बंद असल्यामुळे या बेसहारा लोकांना जगण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आणि अश्या बिकट परिस्थितीत एक  च्या वतीने या बेसहारा लोकांचा. संभाजीनगर पोलीस परळी सहारा बनून समोर आले आणि या लोकांना आज जेवण दिले आहे. एक  कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही.
या कार्याची प्रेरणा घेऊन ज्या ज्या ठिकाणी अश्या  अशा लोकांना पर्यंत अनछत्र पुरवले तर खूप पुण्य कमून अशा नागरिकांना भोजन दिल्यामुळे त्यांनी अशिर्वाद दिले आहेत. 
     पोलिस म्हणटले की, सामान्य माणूस त्यांच्या पासून चार हात लांब राहणं पसंत करतात आणि कसलाही गुन्हेगार असला तरी तो पोलिसांना घाबरतोच पण कोरोना विषाणुचा पार्श्वभूमीवर परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी पोलीस मधील सामान्य माणसाचे माणुसकीचे दर्शन दिले आहे. परळी शहरातील पेट्रोलिंगच्यावेळी गरजवंत सामान्य माणूस अशा नागरिकांना जेवणाची सोय नाही किंवा हातावर पोट आहे. अशा गरीब व असहाय्य व्यक्तीच्या भोजनाची व्यवस्था स्वखर्चाने करून दिली आहे. यामुळे पोलिस यांच्या माणसुकीच्या दर्शनाचे कौतुक होत आहे. संभाजीनगरचे रमेश सिरसाट, दत्ता गित्ते, पवार, बडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment