तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

प्रशासनाला सहकार्य करा..तहसिलदार ज्योती चव्हान.


आरूणा शर्मा
पालम तहसिल दिनांक 20 मार्च रोजी कोरोना या विषाणू  महाभयंकर महामारी विषयी  माननीय तहसिलदार ज्योती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली या वेळी  तालुक्यातील जनतेस आवाहन केले की जनतेने अत्यंत आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे एकमेका पासून एक मीटरचा अंतर ठेवून दैनंदिन व्यवहार ठेवावेत, आपल्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी,परिसर स्वच्छ ठेवावे व अफेवर विश्वास ठेऊ नये.प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान तहसिलदार  यांनी बैठकीत केले.या बैठकीस नायब तहसीलदार महसूल व पुरवठा श्री प्रकाश गायकवाड,नायब तहसिलदार निवडणूक व संजय गांधी योजना श्री मंदार इंदुरीकर , नैसर्गिक आपत्ती कक्ष अवल कारकून भारत घनसावंत, तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर के. व्हि.निरस,महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष वैजनाथ फड  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment