तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

वाशिम जिल्ह्यात जिवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व चढ्या दराने विक्रीची शक्यता....जीवनावश्यक बाबींच्या सुरळीत पुरवठयासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना करा
फुलचंद भगत यांची मागणी

वाशिम-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. याकाळात जिल्ह्यात अन्न धान्ये आणि जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा नियंञण समिती असणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे प्रसासनाकडे मागणी केली आहे कारण या काळात जिवनावश्यक वस्तुंची साठेबाजी,चढ्या दराने वस्तु मालाची विक्रि होन्याचे चिञ काही ठिकाणी पाहावयास मिळत आहे.गरिब गरजु लोकांना जिवनावश्यक वस्तुंची खरेदी या संचारबंदी काळात करावी लागणार आहे त्यामुळे अशी नियंञण ठेवणारी जिल्हास्तरिय समिती असणे अत्यावश्यक असल्याचे भगत यांनी सांगीतले. या समितीव्दारा शहर हद्दीत गर्दी होऊ नये, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ न देणे यांचा आढावा घेऊन लोकांपर्यंत अन्न-धान्याचा पुरवठा होत असल्याची खात्री करावी. तसेच अन्न धान्य वितरण अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करावी, असे प्रसिध्दीपञकात नमूद करण्यात आले आहे.अशाच प्रकारे प्रत्येक तालुकास्तरावर व गावपातळीवरही नियंञण करणारी समिती आहे.शासनाच्या अशा समितीमुळे साठेबाजीला व चढ्या दराने जिवनावश्यक वस्तु विक्रीला आळा बसुन लोकांना मदत होईल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment