तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

परळीत सिमेंट कंपनीत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्यातील. आरोपींना तात्काळ अटक करा- रामराव गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी- धर्मापुरी मार्गावरील  कोरोमंडल किंग सिमेंट कंपनीत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार दत्तात्रेय काळे, महादेव शिंदे व संभाजी मुंडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लायाचा तीव्र शब्दात निषेध करून  हल्लेखोर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव गित्ते यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे. 
        याबाबत रामराव गित्ते पुढे बोलंतांना म्हणाले की, परदेशातील उत्पत्ती झालेल्या कोरोना या महाभयानक विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने भारतातील सर्वच राज्यात पसरला आहे. जिल्हाधिकारी यांनी कडक निर्देश केले आहेत की, हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, स्वछता राखणे, गर्दी न करणे अशा अनेक गोष्टींच्या त्याअनुषंगाने प्रशासनाने विविध वर्गांसाठी वेगवेगळ्या गाईडलाईन दिल्या आहेत. त्यांचे पालन   केले जात आहे की नाही याबाबत वार्तांकन करण्यासाठी दै. मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, दै. युवासोबतीचे तालुका प्रतिनिधी महादेव शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी संभाजी मुंडे आदी माध्यम प्रतिनिधी दि. 20 मार्च रोजी सिमेंट कारखान्याला भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कारखाना गेटवर अडवले गेले. तेव्हा तिथे उपस्थित कर्मचारी मंडळींना पत्रकारांनी विचारणा केली की आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी कशाप्रकारे घेत आहात? मास्क का लावला नाही? तेव्हा तिथे उपस्थित काही अज्ञात व्यक्तींनी तुम्ही आम्हांला प्रश्न विचारणारे कोण असे म्हणत अचानक हल्ला चढविला. या प्राण घातक हल्ले मध्ये जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. सदर घटनेचा निषेध व्यक्त करून ही झालेली घटना निंदनीय आहे. या हल्लायातील गुन्हेगारांना तात्काळ कारवाई करावी. सामाजातील.कोणत्याही घटनेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ करीत असतो. ह्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न निंदनीय असून याचा जाहीर निषेध करतो. आरोपी विरोधात
पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2017 तथा भा. द. वि. कलम 323, 504, 506 व 34 तूर्तास अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. परळीतील भा.द.वि.307 कलम फक्त न घडलेल्या व राजकिय पुढाऱ्याच्या म्हणण्यावरच लावायच का ?  या घटनेत कडक कलमे लाऊन या सिमेंट कंपनीच्या पडद्यामागील खरे चेहरे उघड कराणार का ? हीच काय शांत परळी ! निर्भिड परळी !! स्वच्छ परळी !!! प्रदुषण मुक्त परळी  आहे का ?.असा.सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.  या आधी व्यापारी मारहाण प्रकरण, खून आणि मारमरीच्या घटना परळीत घडल्या आहेत. आता पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. एकंदर परळीत कायदा सुव्यवस्था बिघडत चालली असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी रामराव गित्ते यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment