तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी- लहुदास तांदळेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणुचा जगभर थैमान घातले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबून आपले व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय किसान काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष लहुदास तांदळे यांनी केले आहे. 
     जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री बारा वाजता पासून पुढील २१ दिवस अख्खा देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. पण लोकांनी २१ दिवस घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी आहे. बाकीच्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशाप्रकारे आवाहन त्यांनी केले आहे. जगात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभाग जिवाचे राण करून नागरिकांना वेळोवेळी उपाय योजनेच्या  सुचना देत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातुन आलेल्या नागरिंकांनी स्थानिक  प्रशासनाकडे तसेच आरोग्य विभागाला सहकार्य करावे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका आणि सार्वजनिक संपर्क टाळा, या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, जिल्हा प्रशासनाने आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हा यंत्रणेबरोबरच आता महसूल, आरोग्य आणि पोलीस दलाच्या सहकार्याने ग्रामीण भागातही गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या या संकटावर आपण नक्कीच मात करू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी योग्य खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे घरीच थांबा, घाबरू नका, काळजी घ्या, सहकार्य करा, सुरक्षित राहा, कोरोनाला हरविण्याची संकल्पनाची गुढी उभारून, ज्यांच्यामुळे आपण सुखात घरात आहोत अशा सर्व डॉक्टर, नर्स, वार्ड स्टाफ, पोलिस व कर्मचारी, मिडिया प्रतिनिधी सर्वांना गुढीपाडवाच्या निरोगी शुभेच्छा. कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तांदळे यांनी केले.

No comments:

Post a Comment