तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी परळी तहसीलदार यांनी केल्या अशा सूचनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.20 - कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे जिल्हास्तरावरून होत असलेल्या उपायोजना बरोबरच तालुकास्तरावरही प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहेत.मोठ्या शहरात नोकरीसाठी गेलेले नागरिक आता आपल्या गावाकडे येऊ लागले आहेत.या नागरिकांसाठी परळीचे तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी काही सूचना शोषल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

यामध्ये घरी आल्यानंतर सर्वात प्रथम गरम पाण्याने साबणाने स्वच्छ आंघोळ करणे,
घरात इकडे तिकडे आंघोळीपूर्वी स्पर्श करू न करणे,मोबाईल,रिमोट सारख्या वस्तू सॅनिटायझर ने सतत स्वच्छ करणे,स्वच्छता बाळगणे,घरचेच अन्न घेणे,मास्क किंवा स्वच्छ रुमाल तोंड झाकण्यासाठी वापरणे, व्हिटॅमिन - C साठी लिंबू ,संत्री,मोसंबी या फळांचा वापर करणे,8 तासांची झोप घेणे या बाबी खबरदारी ने आचरणात आणायच्या आहेत

आपण सुट्टीवर आला आहात तर घरीच थांबा इकडे तिकडे फिरु नका.वरील सर्व गोष्टी या कमीत कमी पंधरा दिवसांसाठी पाळावयाच्या आहेत.तर सर्दी खोकला ताप इतर काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा संपर्क साधावा व त्यांना बाहेर गावावरून आल्याची कल्पना द्यावी.लक्षात घ्या आपल्या या खबरदारीने आपण कोरोना आजाराचा प्रसार आपल्या गावामध्ये थांबवू शकतो.या व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी स्वतःची काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही डॉ.पाटील यांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment