तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

पुणे मुंबई येथून आलेल्या नागरिकांनी स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्यावी उप सभापती राजेंद्र मगर


शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर 

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, जे नागरिक विद्यार्थी पुणे मुंबई व ईतरञ ठिकाणाहून आले आहेत, त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करुण घ्यावी परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी गेलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन वैजापुर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र मगर यांनी केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटिल गावकरी या नागरिकांनी आवाहन करावे आणि त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, आरोग्य यंत्रणानी अशी माहिती आल्यास संबंधितांची तपासणी करेल,असे ते म्हणाले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सकारात्मक पावले उचलली आहेत. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डाॅ रामचंद्र मुरमुडे यांनी सांगितले 
कोरोना विषाणू संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गावात परत आल्यानंतर अशा नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. यादृष्टीने ती नावे आरोग्य विभाग व प्रशासनाकडे कळवावीत. तसेच त्यांच्या पातळीवरुनही संबंधितांना आरोग्य तपासणी करण्याबाबत अवगत करावे, अशा सूचना दिल्या.
आतापर्यंत तालुक्यातील कोणत्याही नागरिकास या विषाणूची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. असे कोणी नागरिक बाहेरुन आले असतील तर त्यांनीही स्वताची आरोग्य तपासणी करुन घ्यावी,असे आरोग्य आधिकारी डाॅ रामचंद्र मुरमुडे यांनी सांगितले
करोना आजार होऊ नये यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, नियमबध्द जीवनशैलीचा अवलंब करा. स्वत:हून कोणताही उपचार करु नये, डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच उपचार करावा, असे आवाहनही डाॅ मुरमुडे यांनी केले.

●●●कोरोना संदर्भात अर्धवट खोटी चुकीची माहिती पसरवुन नका ●●●
सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने नागरिकांनी काळजीचे कारण नाही, असे शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले 
जिल्ह्यात पूर्वकाळजी म्हणून सर्व प्रकारचे शासकीय कार्यक्रम व मेळावे रद्द करण्यात आले आहेत. सर्व यात्रा-जत्रा तसेच विविध मोठ्या स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणार्‍या संयोजकांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत आणि नागरिकांनीही अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केले.

No comments:

Post a Comment