तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत ग्रामस्थांनी घाबरू नका, विशेष काळजी घ्यावी-ग्रामसेवक अनिल हजारे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले. या संसर्गजन्य रोगामुळे भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र देखील अनेक कोरोनो बाधित रुग्ण आढळले आहे. यामुळे शासनाने सर्व ठिकाणी स्वच्छता व आरोग्यची काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत ग्रामस्थांनी घाबरू नका, विशेष काळजी घ्यावी, घाबरू नका तसेच शासनाने दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी पालन करावे असे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती ग्रामसेवक अनिल हजारे यांनी दिली.

     याबाबत ग्रामपंचायतच्या वतीने एक परिपत्रक काढण्यात आले आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या व्हायरसने भारतातही आपले पाय पसरले आहेत. जगातील अनेक देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरशः हैदोस घातला आहे. हजारो लोकांचा बळी घेतला आहे.महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.त्याला प्रतिबंध म्हणून शासन आणि प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आपणही शासन आणि प्रशासनाला सहकार्य करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.त्यामुळे गर्दीचे समारंभ टाळावेत आणि शासन प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच ग्रुप ग्रामपंचायत लमानतंडा येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की कोरोना विषाणू चा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार गावातील सर्व लग्न समारंभ सप्ताह भजन कार्यक्रम व इतर कोणतेही कार्यक्रम ज्यात लोकसहभाग हा जास्त असतो हे रद्द करण्याचे सूचना दिल्या आहेत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हा व विषाणू हवेमाधून   देखील प्रसारित होत आहे म्हणून दहा (10) पेक्षा जास्त लोकांनी एका ठिकाणी जमाव करण्यात निर्मांध टाकण्यात आले आहेत तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी वयक्तिक स्वच्छता या बाबी लक्षात घेऊन संसर्ग टाळन्यास सहकार्य करावे असे आवाहन  ग्रामपंचायतच्या वतीने करून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी काम नसताना घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन  ग्रामसेवक अधिकारी अनिल हजारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment