तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

आ. नमिता मुंदडांच्या पुढाकाराने रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न सुटला..


 ४०० व्यक्तींना महिनाभर पुरेल 
एवढे किराणा सामान स्वाराती रुग्णालयाकडे सुपूर्द
एकूण १२ हजार व्यक्तींना मिळणार लाभ

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी, हॉटेल आणि खानावळी बंद असल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी प्रचंड त्रास सहन करवा लागत होते. ही अडचण लक्षात घेत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या पुढाकाराने ४०० व्यक्तींना महिनाभर प्रतिदिन म्हणजेच एकूण १२ हजार व्यक्तींच्या नाश्ता आणि दोन वेळेसच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी त्यासाठीचे सर्व किराणा सामान रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचा ओढा प्रचंड आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्यांचे नातेवाईकही सोबत आलेले असतात. रुग्णांच्या नाश्ता, जेवणाची व्यवस्था स्वाराती रुग्णालयाकडून करण्यात येते. मात्र, सध्या संचारबंदीमुळे हॉटेल आणि खानावळी बंद आहे. तसेच सर्वत्र नाकाबंदी असल्याने घरून डब्बा मागवणेही अवघड झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाश्ता आणि भोजनासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी पुढाकार घेत रुग्णांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न सोडविला आहे. आ. मुंदडा यांच्या वतीने ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिड लाख रुपये तर अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एक लाख असे एकूण अडीच लाख रुपये जमा करण्यात येऊन त्यातून ४०० व्यक्तींसाठी महिनाभर चहा, नाश्ता आणि दोन वेळेसच्या जेवणासाठीचे गहू, तांदूळ, डाळ, तेल, मसाला, साखर, चहापत्ती, पोहे आदी किराणा सामान स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुंदडा यांच्या समवेत मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, सभापती मधुकर काचगुंडे, डॉ. संदीप थोरात, ॲड. जयसिंग चव्हाण, प्रसिद्ध व्यापारी राजुसेठ भन्साळी, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, पत्रकार अभिजीत गाठाळ आदी उपस्थित होते. यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून पाकशाळेत भोजन तयार करून ते नातेवाईकांनाही देण्यात येणार आहे. प्रतिदिन ४०० व्यक्तींना महिनाभर म्हणजेच एकूण १२ हजार व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.स्वतः पुढाकार घेऊन योगदान देत रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न सोडविल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आ. मुंदडा आणि बाजार समितीचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment