तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

कोरोना च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतली पत्रकार परिषद


बाळू राऊत प्रतिनिधी 
*मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू*
मुंबई :कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. आपल्या देशात आलेल्या या संकटातून कसे मुक्त होयचे या संदर्भात सगळ्याना प्रश्न पडला आहे. कोरोना व्हायरस जगभरात थैमान घातले आहे. जगापुढे एकच प्रश्न आहे या संकटातून मुक्त कसे होता येईल 
आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि येथून पुढेही आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. 
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.खबरदारी घ्या. 
रेल्वे, खासगी बसेस ,एसटी आणी खाजगी बसेस 31 मार्च पर्यंत बंद राहणार बसेस बंद करीत आहोत.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. 
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. 
चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं बंद करा
अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती 
पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन ची घोषणा
अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका
सरकारी कार्यलयात फक्त 5% कर्मचारी काम करतील

No comments:

Post a Comment