तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

बोडखा येथे युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या


 संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बोडखा येथील युवकाने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली
 संग्रामपूर तालुक्यातील ग्राम बोडखा येथील तरुण युवक आकाश एकनाथ उमाळे वय २२ वर्ष याने राहत्या घरी दि२० च्या मध्यरात्री  अंदाजे १ वाजता दरम्यान दोरी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे कि आकाश उमाळे या युवकाने एच डी एफ सी बॅकेचे क्रेडीड कार्डावर  कर्ज घेतले होते  कर्जाची रक्कम हप्ता भरणासाठी एच डी एफ सी बॅकेचे अधिकारी कर्मचारी सतत कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा लावत होते  सतत फोन वरून ट्रार्चरला कंटाळून  नैराश्यातुन आकाशने गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली सदर घटनास्थळी तामगाव पोलीसांनी भेट देऊन पंचनाम करुन  ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर यांनी प्रेताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाहिकांच्या ताब्यात देण्यात आले आकाश उमाळे यांच्या पश्चात आई,एक भाऊ,चार बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे  मृतक हा घरचा कर्ता पुरुष होता मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment