तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी; प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे- पैलवान मुरलीधर मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. जिल्ह्यात प्रादुर्भाव होवू नये म्हणून सर्वांनी सर्तक राहावे व काळजी घ्यावी. तसेच राज्यात संचारबंदी लागु आहे. कोणीही घराबाहेर पडु नये , शासनाच्या आदेशाचे पालन करावे. घरा बाहेर पडूच नये,  कुटुबाची काळजी घ्या तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कुस्तीगिर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांनी केले आहे. 
          कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या कोव्हीड-१९ या आजाराने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक  उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने, आस्थापना, सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल व सर्व रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये या आवाहनाला धुडकावत नागरिक घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असले तरीही जोवर नागरिकांमध्ये जागृती होत नाही तोपर्यंत या आजाराला रोखणे कठीण आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी घरी बसावे. सोबतच आपण आपली काळजी कशी घ्यावी ? या महाभयंकर विषाणू पासून स्वःताचा.बचाव करण्यासाठी घरी बसणे हाच पर्याय आहे.  प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमांतुन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नाहीत.रस्त्यावर अश्या प्रकारच्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे. टिव्हीवरची जागृती ते असलेली घरच्या खिडकीसमोरची जागृती या सर्वच स्तरातुन होत असलेल्या जनजागृतीमुळे लोक गांभीर्याने विचार करुन योग्य ती काळजी घेत आहेत. या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू त्यानंतर संचारबंदी आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहे. ही संख्या कमी नाही, तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.  त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा गर्दीचे ठिकाणे टाळा,योग्य आहार घ्या,गरज भासल्यासच घराबाहेर पडा, आपले हात वारंवार धुवा स्वच्छ ठेवा,यासाठी सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा वापर करा,करोनाला घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या,करोना विषाणू आजाराची साथ लवकरच अटोक्यात येईल त्यामुळे अफवा व चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेवू नका, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार व प्रशासन सक्षम आहे.केंद्र व राज्य सरकारने करोना प्रतिबंधासाठी सुचविलेले.सर्व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबवावेत आणि स्वतःची व स्वताःच्या कुटुंबाची आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा असे आवाहन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment