तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

शेतीमाल भाजीपाला, फळे, याची वाहतुक व विक्रीसाठी व्यवस्था करावी — आ.सुजितसिंह ठाकुर


उस्मानाबाद (प्रतिनिधी) :- 
कोरोना संसर्गजन्य विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने नाशवंत शेतीमाल, भाजीपाला, फळे वाहतुक व विक्रीसाठी व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकुर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, कोरोना संसर्गजन्य विषाणुचा फैलाव हि राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी संपुर्ण देश व राज्यात लॉकडाऊन करावे लागले आहे. लॉकडाऊनमध्ये जिवनावश्यक वस्तुंच्या विक्रीस परवाणगी आहे. मात्र सर्व वाहतुक बंद असल्याने पालेभाज्या, फळे, अशा नाशवंत पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मराठवाड्यातील शेतकरी सततचा दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे त्रस्त आहे. पालेभाज्या, फळे अशा नाशवंत पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान टाळण्याकरीता जिल्हा व तालुका स्तरावर संपर्क क्रंमाकासह शेतकरी मदत केंद्र सुरु करुन संबधीत कृषीअधिकाऱ्याने नोंद घेवुन पालेभाज्या, फळे वाहतुकीसाठीचे प्रमाणपत्र देवुन राज्यात, जिल्ह्याबाहेर वाहतुक व विक्री करणे सोयीचे होईल. आपण सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस प्रशासनास निर्देश देेणे आवश्यक आहे. तसेच जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालेभाज्या, फळे, तत्सम जिवनावश्यक वस्तु जेवणाचा डब्बा देणारे अशा घरपोच सेवा देणाऱ्यांची महानगरपालिका, नगरपालीका, नगरपंचायत, मोठ्या ग्रामपंचायती यांनी भाग निहाय नोंद घेवुन त्यांची संपर्क क्रंमाकासह सुचि करुन त्यांना ओळखपत्र दिल्यास पोलीस यंत्रणेतील ताण कमी होईल, अशी मागणी निवेदनात केली आहे.

No comments:

Post a Comment