तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

खोट्या व फसव्या संदेशावर विश्वास ठेवू नये


कोरोना विषाणू संदर्भात खोटे संदेश प्रसारीत करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

बुलडाणा :-

            वृत्तपत्रे व दुधाच्या पिशव्या याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित सूचना म्हणून समाज माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या खोट्या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. नुकतेच असा एक संदेश समाज माध्यमांतून पसरत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. यासंदर्भात सदर व्यक्तीविरुध्द व व्हॉटस् ॲप ग्रुपवर सायबर क्राईम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत  आहे.
            नगारिकांनी अशा खोट्या संदेशावर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये, सजग राहून खबरदारी घ्यावी. घाबरु नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
            हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक  1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक  (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा  8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे.
            राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment