तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

पातुर्डा प्रा आरोग्य केंन्द्रात रुग्णाची नोंदणी कर्मचारीची दांडी औषध निर्माताने रुग्णांची नोंदणी केली


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंन्द्र सर्वात मोठे असुन या आरोग्य केंन्द्राला २३ खेडे लागु असल्याने शेतकरी शेत मजुर मोठया प्रमाणात आहेत गावातील व संबंधीत खेडे गावातील शेतकरी शेतमजुर रुग्णांची गर्दीने नेहमी आरोग्य केन्द्रात फुललेला असतो वातावरणाच्या बदला मुळे सर्दी ताप डोके दुखी आजार वाढले तर कोरोना संसर्गजन्य आजार डोके वर करू पाहत असल्याने मुंबई येथुन आलेल्या नागरिक व परिसरातील नागरिक कोरोना पाश्वभुमिवर तपासणीसाठी आलेल्याना बराच वेळ ताळकळत बसावे लागले  वातावरणाच्या बदला मुळे नेहमी उद्भभवणारे आजार व कोरोना संसर्गजन्य याचे लक्षण साम्य असल्याने पातुर्डा परिसरातील नागरिक रक्त तपासणी सह चाचणीसाठी प्राथमिक आरोग्यात धाव घेत असल्याने त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी ओपीडी रूग्णाचे नाव नोंदणी करण्यासाठी रजेचा अर्ज वैधकिय अधिकारी यांच्या कडे न देता अनउपस्थीत राहिल्याने आरोग्य केंन्द्रात फुललेली गर्दी पाहुन औषध निर्माता शेगोकार यांनी प्रथम रुग्णाची नोंदी केल्या व वैधकिय अधिकारी निर्मल गिते यांनी आलेल्या रूग्णाची तपासणी करून चिटटीवर औषध लिहून दिल्यानंतर औषध निर्माता शेगोकार यांनी आरोग्य केन्द्रात उपलब्ध औषध रुग्णाना दिले रुग्णाची नोंद करणाऱ्या कर्मचारीला वैधकिय अधिकारी यांनी दुरध्वनी वरुन विचार केली परंतु संबंधीत कर्मचारी कडून समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याने संबंधीत कर्मचारीच्या मनमानी कारभारा विरुद्ध वरिष्ठांना कळविले कोरोना प्रादुर्भाव पाश्वभुमिवर कर्तव्यात कसुर करणाऱ्या आरोग्य विभाग कोणती कारवाई करते याकडे पातुर्डा ग्रामस्थासह खेडेगावातील रुग्णांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a comment