तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत ; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- सोशल मिडियावरील कोरोनाच्या अफवांमुळे राज्यासह बीड जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म व्यवसायाचा बाजार उठला आहे.राज्यात असंख्य शेतकरी आहेत,ज्यांनी शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केलं, त्या शेतकर्‍यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.बँकाकडून लाखोंचं कर्ज घेतलं,कधी स्वत: कडील शिल्लक पैशातून शेड उभारले,पिलांची जपणूक केली. परंतु,एक कोरोना व्हायरस आला काय शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.


चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.मात्र या कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मात्र मोठ्या संकटात सापडला आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणार्‍या अफवा यासाठी कारणीभूत ठरत आहेत.चिकन खाल्याने कोरोनाची लागण होते.असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.याचा परिणाम असा झाला की,चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे एवढे कमी म्हणजे नऊ ते दहा रुपये किलो झाले आहेत.गेल्या 8 दिवसांत महाराष्ट्रातील पोल्ट्रीचे अंदाजे 600 कोटींचं नुकसान झालं आहे.तर आतापर्यंतच्या नुकसानीचा आकडा हा 900 कोटींच्या घरात गेला आहे.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील गोविंद उत्तमराव ठोंबरे या तरूणाने केज तालुक्यातील उंदरी येथे योगेश्‍वरी कुक्कुटपालन सुरू केले.सध्या त्यांच्याकडे सहा हजार पक्षी आहेत. प्रत्येक पक्षी हा अडीच किलो एवढ्या वजनाचा आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव तसेच अफवा पसरण्यापुर्वी कुक्कुटपालकांकडून 105 रूपये किलो दराने कंपन्या पक्षांची खरेदी करीत होत्या. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणार्‍या अफवा यासाठी कारणीभूत ठरत आहेत.चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते,असे चुकीचे मेसेज काही दिवसांपासून सोशल मिडियावर फिरत आहेत.याचा परिणाम असा झाला की, चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे एवढे कमी म्हणजे नऊ ते दहा रुपये किलो झाले आहेत. अंबाजोगाई व केज तालुक्यातील कुक्कुटपालकांकडून केवळ पाच रूपये एवढ्या नाममात्र दराने कोंबड्यांची खरेदी होवू लागल्याने एका पक्षामागे दिडशे ते दोनशे रूपये नुकसान या उद्योगातील गोविंद ठोंबरें सारख्या युवकांना सोसावे लागत आहे.कोणतेही अर्थसहाय्य न घेता स्वयंरोजगार करण्याच्या ध्येयाने प्रेरीत होवून गोविंद ठोंबरे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय निवडला.स्वतःची शेत जमीन पाणी तसेच विकत लाईट व वैद्यकीय सेवांवरील उपचार केबीज कंपनी (झारखंड) येथून खाद्य खरेदी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून तयार पिल्ले खरेदी करून व्यवसाय सुरू केला.तब्बल 14 लाख रूपये खर्चुन सर्व सुविधा उपलब्ध असणारे एक शेड उभा केले.या ठिकाणी दोन कामगार काम करतात.त्यांचा प्रत्येक महिन्याचा पगार 18 हजार रूपये असा एकुण ठोंबरे यांचा सुमारे 36 लक्ष रूपये खर्च झाला आहे.अशी मागणी कुक्कुट पालकांमधून करण्यात येत आहे.

चिकनमधून कोरोना व्हायरस पसरत नाही

राज्यभरात चिकनचे दर चाळीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चिकनच्या दरात झालेल्या घसरणीने पोल्ट्री व्यावसायिकांना एका कोंबडी मागे फक्त 20 ते 30 रुपये मिळत आहेत.भाव कमी करुन ही विक्री होत नसल्यानं कोंबड्यांचं काय.? करायचं असा प्रश्‍न आता पोल्ट्री व्यावसायिकांना पडला आहे. चिकनमधून कोरोना व्हायरस पसरत नाही.एका कोरोना व्हायरसच्या अफवेने ठोंबरे यांच्या सारख्या असंख्य कुक्कुटपालकांचा कुक्कुटपालन हा व्यवसाय मोडीत निघत असून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.तेंव्हा कुक्कुटपालन करणार्‍या व्यवसायीकांची नोंदणी करावी तसेच महसुल विभागामार्फत पंचनामे करून त्यांना तातडीने मदत द्यावी.

-गोविंद उत्तमराव ठोंबरे (पोल्ट्री व्यावसायीक)

No comments:

Post a Comment