तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

कोरोना लढाई : महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर


व्हायरसच्या संक्रमणाविषयी आणि बचाव कार्याविषयी पंतप्रधान कार्यालयाला द्यावी लागणार माहिती
बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई :कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्यात लागु असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशात लॉकडाऊन केले आहे त्याला संपूर्ण जनतेने प्रतिसाद देणे गरजेचे आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागातील माहिती मिळविण्यासाठी प्रत्येक राज्यात कॅबिनेट मंत्र्यांना प्रभारी नेमले आहेत. हे प्रभारी या मंत्र्यांना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून आढावा घ्यायला सांगण्यात आलं आहे. हे मंत्री गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेली नियमावली पाळण्यात अडचण तर येत नाही ना, याची माहिती घेणार आहेत. याशिवाय अडचणीमध्ये केंद्र सरकार राज्याला कशी मदत करु शकते, यावरही मंत्री लक्ष ठेवणार आहेत.
बाहेरुन किती लोकं आपल्या जिल्ह्यामध्ये परत आली आहेत. जिल्ह्यामध्ये किती जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. किती जण क्वारंटाईन आहेत, या सगळ्याची माहिती मंत्री घेतील. राज्यांची जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांना रोज पंतप्रधान कार्यालयाला व्हायरसच्या संक्रमणाविषयी आणि बचाव कार्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, यांच्या वर सोपवली आहे.

No comments:

Post a Comment