तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

संचारबंदी काळात खाजगी दवाखाने सुरू ठेवा-लक्ष्मणभाऊ उगलमुगलेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्र सरकार सह भारत सरकाने कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी कायदा लागू केला आहे.त्या कायद्यामुळे सर्व दुकाने, मॉल, दवाखाने बाजार, शाळा, बंद आहेत.पोलिसांनी कायद्याचा धाक दाखविल्याने व पोलिसांकडून मारहाणीचे प्रकार सुरू असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे.त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व आजारी पेशंट वैतागले असून औषधोपचार मिळत नसल्याने खूप मोठी नामुष्की ओढवली आहे.त्यामुळे खाजगी दवाखाने सुरू ठेवावे अशी मागणी वंजारी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस व ओबीसी फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण श्री लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात श्री लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी म्हटले आहे की,देशात 144 कलम लागू असून संचारबंदी आहे.कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.परंतु कलम 144 नुसार ग्रामीण व शहरी भागातील खाजगी दवाखाने बंद असल्याने आजारी पेशंटला उपचार मिळत नाही.सेल्फ मेडिसीन घेतल्याने पेशंट दगाऊ शकतो. म्हणून कलम 144 थोडे शिथिल करून खाजगी दवाखाने सुरू ठेवावे.म्हणजे आजारी लोकांना औषधोपचार घेता येतील.आजारी लोकांची गैरसोय टळेल.तसेच दवाखान्यात आलेल्या किंवा मेडिसीन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना पोलिसांनी विचारपूस केल्याशिवाय मारहाण करू नये.असे आदेश पोलिसांना द्यावेत.असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a comment