तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

वाशिम जिल्ह्यातील दारुचे दुकाने बंद सोबतच पानटपर्‍याही बंद ठेवन्याचे अखेर आदेश धडकले


सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांच्या मागणीला यश 

वाशिम जिल्ह्यातील पानपट्ट्या,चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश

 ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

वाशिम, दि. २० : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या व स्नॅक्स हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.थुंकीतुन कोरोना व्हायरसचा प्रसार होवु शकतो त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारे दुकानं आणी पानटपर्‍या बंद करन्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी एका प्रसिध्दी पञकाव्दारे मागणी प्रशासनाला केली होती,या मागणीला यश अाहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ लागू करण्यात आला आहे. तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळणे आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या व स्नॅक्स हॉटेल्स २० मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. किराणा दुकाने, दुध अथवा दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तू यांची विक्री गर्दी टाळून करावी. कोणत्याही व्यक्तीने या आदेशांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व साथरोग प्रतिबंध कायदा-१८९७ कलम २ अन्वये तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.प्रशासनाच्या या आदेशामुळे फुलचंद भगत यांनी प्रशासनाचे आभार मानले असुन प्रशासनाला लोकांनी सहकार्य करन्याचे आवाहनही केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment