तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

किराणा दुकानदारांकडून होतेय गोरगरिब ग्राहकांची लुट !सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २६ _ कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी लोक हतबल झाले असताना, अनेक ठिकाणी किराणा व्यापारी लाॅकडाऊनच्या नावाखाली गोरगरिबांची लुट करत असल्याने चीड व्यक्त केली जात आहे. देश कठीण परिस्थितीतून जात असताना, शहरातील काही किराणा दुकानदार टाळेवरचे लोणी खात असल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
      देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २१ दिवस लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असेलेल्या गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत. कामावर जाता येईना व घरात दोन वेळचे जेवण बनवण्यासाठी किराणा दुकानात जाऊन खरेदी करायची तर, किराणा दुकानदार बेभावाने किराणा विक्री करू लागले आहे. नाविलाजाने चढ्या भावाने किराणा माल खरेदी करावा लागतो आहे. आ. लक्ष्मण पवार यांनी लक्ष घालून जादा दराने किराणा देण्या-या  दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होऊ लागली आहे. व्यापारी बांधवांनी गोरगरिबांना किराणा मालाची विक्री करतांना गोरगरिबांची आर्थिक लुट करत असल्याचे चिञ दिसत आहे. महासंकट काळी सर्वांनी एकत्र येऊन देशावरचे आलेल संकट दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेवराई येथील टाळूवरील लोणी खाणा-या व्यापा-यांनी नेहमीच्या दरा पेक्षाही जास्त दराने किराणा मालाची विक्री करू लागले आहेत. 
        अनेकांना इतर वेळी दोन वेळाचे खायचे वांदे असतात. लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. अव्वाच्या सव्वा किंमती लावून दुकानदार गोरगरिबांची आर्थिक लुट करू लागले आहेत. अशा मुजोर दुकानदारांना धडा शिकवला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment