तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

बीड जिल्ह्यात सामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल विक्रीस बंदी !




बीड (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे,त्यामुळे उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल वितरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे,अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल आणि डिझेल देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत, हे आदेश मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .
कोरोना व्हायरस देशात झपाट्याने फैलावत असल्याने देश 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे,तसेच बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे,तरीदेखील काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यावर बंदी घातली आहे .अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये पाणी पुरवठा करणारी वाहने,मेडिकल,अम्ब्युलन्स,शासकीय वाहने,पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे वाहने,शासकीय पुरवठा करणारी वाहने यांना पेट्रोल डिझेल देण्यात येईल,त्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना मिळणार नाही असे आदेशात म्हंटले आहे .या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे . 

No comments:

Post a Comment