तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

संस्कार प्राथमिक शाळेत भव्य असे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     संस्कार प्राथमिक शाळेत दिनांक 14 मार्च वार शनिवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अश्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार प्राथमिक शाळा ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक गोष्टींचे ज्ञान वाढावे या साठी नेहमीच प्रयत्नशील असते. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा या हेतूने शाळेने विज्ञान प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञानेतून झाला आहे. ज्ञानासंबंधीचे विशुद्ध प्रेम ही विज्ञानाची प्रेरणा आहे. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. विज्ञान हे सत्यसंशोधनासाठी प्रयत्नशील असते; परंतु वैज्ञानिक सत्य हे विशेष स्वरूपाचे असते. विज्ञानाला अभिप्रेत असलेले सत्य हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसते, तर ते वैचारिक स्वरूपाचे असते. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित असते. एखादी व्यक्ती कितीही महान असली आणि धर्म, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांतील तिचा अधिकार कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला प्रत्ययाला आलेल्या सत्यावर, स्वत:च्या अनुभूतीवर किंवा साक्षात्कारावर विज्ञान विश्वास ठेवू शकत नाही. विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविते. विज्ञान हा प्रगतीचा स्रोत आहे. यासाठी  विध्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून संस्कार शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्व  विद्यार्थी पालक यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी .

No comments:

Post a Comment