तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

परळीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या घरणीकर रोडवरील मंजिस बेकरी उघडी ठेऊन गर्दी केल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परळीत जनता कर्फ्यू १०० टक्के यशस्वी झाल्यानंतर येथील जनतेत कोरोना प्रसारबाबत चांगली जनजागृती झाल्याचे वाटत होते. मात्र, सोमवारी जिल्ह्यात १४४ नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे शहरातील मँजिस बेकरी उघडी ठेऊन गर्दी केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  किरण नारायण शिंदे,  ओमेश गिरधारीलाल भंडारी यांनी मॉजिन्स बेकरी उघडी ठेवून गर्दी केल्या प्रकरणी मा.जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सोमवार दि. 23-03-2020 रोजी पोलीस ठाणे परळी शहर येथे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
          राज्यात राज्यशासनाने 13 मार्च 2020 पासून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 लागू केला आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी बीड यांनी या कायद्यातील खंड 2.3.4 या तरतूदीच्या अंमलबजावणी करीता आदेश जारी कले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात जमावबंदी लागू आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात काव्हीड -19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केला असून यातील नियम क्र.3 नुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियत्रण करण्यासाठी मा, जिल्हाधिकारी यांनी दि.19-03-2020 तसेच राज्यात क्रिमीनल प्रोसिजर कोड (crpe) कलम 144 लागू करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोजी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे दुकाने बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांनी जमावबंदी आदेशाचे तसेच मा जिल्हाधिकारी यांच्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना मधील अधिसूचनाचे उल्लघंन करणान्यांवर कारवाई चे आदेश ठाणेदार यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

    तसेच पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.
तरी जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू आहे.तसेच या आदेशाचे उल्नर्धन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. सकाळी ।। ते दुपारी 3 वाजेपर्यंत संचारबंदी शिथलीकरण आहे. त्यामध्ये ज्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तूची आवश्यकता आहे त्यांनीच घराबाहेर पडावे. इतरांनी घराबाहेर पडू नये, पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वानी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment