तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता महिलांनी काळजी घ्यावी - सौ.पल्लवीताई भोयटे-मेमाणेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपूर्ण जगात खळबळ माजलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने जनसामान्यांना हैराण करून टाकले आहे. या कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवती आघाडीच्या शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई भोयटे-मेमाणे यांनी एका प्रसिद्धपत्रकाव्दारे केले आहे. 

      कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या व्हायरसने भारतातही आपले पाय पसरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला वेळीच काळजी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.कोरोना व्हायरस पासून नागरीकांचे संरक्षण होण्यासाठी वारंवार हात साबणाने किवा हॅण्डवॉशने स्वच्छ करणे आवश्यक आहे. तरी त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जर घरातील महिला तंदुरुस्त असेल तर त्यांचे कुटुंब निरोगी राहील म्हणून महिलांनी परिवाराची व स्वतः ची काळजी घेतली पाहिजे तसेच महिलांनी व नागरिकांनी काम नसताना घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन असे आवाहन राष्ट्रवादी युवती आघाडीच्या शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई भोयटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment