तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

गाजगाव येथे शेतकरी चर्चासत्र संपन्न


*गोरख पवार वैजापूर औरंगाबाद*

प्रयास आणि कॉस्मो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार, दि. 18 मार्च 2020 रोजी गाजगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे ‘आधुनिक फळबाग लागवड’ या विषयावर शेतकरी चर्चासत्र यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. कृषिसमर्पण फाउंडेशनचे विषयतज्ञ डॉ. विनायक शिंदे-पाटील हे या चर्चासत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  उपस्थित होते. 
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव येथे सहाय्यक प्राध्यापक रुजू असणारया डॉ. शिंदे यांनी ‘आधुनिक पद्धतीने मोसंबी व पेरू लागवड’ या विषयावर मार्गदर्शन करताना जमिनीची निवड, जमिनीची आखणी, रोपांची निवड, लागवडीची योग्य वेळ, कार्यक्षम अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन या बाबींवर विशेष भर दिला. यावेळी प्रयास फाउंडेशनच्या श्री. लक्ष्मण हिवाळे यांनी फळबाग लागवडीचा वातावरणावर होणारया परिणामांची माहिती दिली. शेतकरी बंधू-भगिनींच्या शंकांचे निरसन करून चर्चासत्राची सांगता करण्यात आली. श्री. अरूण म्हस्के, श्री. राजेंद्र जाधव इत्यादी मान्यवर चर्चासत्राला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment