तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

परळीत बंद पडलेल्या वीज निर्मिती केंद्रातील ट्रान्सफार्मरला आग ; लाखोंचे नुकसानपरळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- बंद पडलेल्या जुन्या वीज निर्मिती केंद्रातील ट्रान्सफार्मरला आग लागली असुन यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे अर्धी परळी आणि काही ग्रामीण भागात अंधार निर्माण झाला आहे. कोणताही अधिकारी फोन घेत नसल्याने अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
      येथील जुन्या वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक 1 जवळील 132 के. व्ही. च्या ट्रान्सफार्मरला आज दिनांक 24 रोजी रात्री 10 वाजण्याचे सुमारास अचानक आग लागली. अगदी थोड्याच वेळात आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले. थर्मल आणि परळी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत नेमके किती नुकसान झाले किंवा किती परिणाम झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

No comments:

Post a Comment