तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

बंद काळात रस्त्यावर फिरणार्या सात जणांविरुध्द गुन्हा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
 कोरोणा विषाणुची लागण होवु नये म्हणुन आज दि.21 रोजी रविवारी पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरातील रस्त्यावर फिरुन आदेशाचे उल्लंघन करणार्या सात जणांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 कोरोना विषाणुची लागण होवु नये म्हणुन आज बंद पाळण्यात आला होता.संपुर्ण बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना काही उत्साही लोक बंद काळात शहरातील रस्त्यावर फिरताना दिसत होते.जीवीतास धोकादायक कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असुन हे स्वत:ला माहीत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरताना मिळुन आलेल्या शेख अलिम शेख शबीर,सिध्देश्वर मदन साबळे,प्रकाश अंकुश फड,अन्सार अफसर शेख,विशाल विष्णु कांदे,नदीम खान आयुब खान,सौरभ धर्मराज तुंबड या सात व्यक्तींवर परळी शहर पोलीसांकडुन भादंवि कलम १८८,२६९,२७९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment