तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

श्रीक्षेञ ऊमरी खुर्द व पोहरादेवीची याञा कोरोनाच्या संभाव्य संकटामुळे रद्दवाशिम- राज्यासह देशपातळीवर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र उमरी खुर्द व पोहरादेवी यात्रा कोरोनाचे संभाव्य संकट पाहता अखेर ता १३ मार्च ला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्वसंमतीने यात्रा महोत्सव रद्द केल्याची माहिती प्रस्तुतप्रतिनिधीला दिली.

सप्तमी व अष्टमीला श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथे सामकीमाता व जगद्गुरू संत जेतालाल महाराज समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात हेच भाविक नवमी ला भरणाऱ्या यात्रेत दाखल होतात. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील जगद्गुरू संत सेवालाल महाराज, आई जगदंबादेवी,राष्ट्रीय संत डॉ रामरावबापू महाराज व दानशूर बाबनलाल महाराज चरणी माथा टेकण्यासाठी जवळपास सहा ते सात लाख भाविक येतात गेल्या दीडशे वर्षाची ही परंपरा दरवर्षी असायची मात्र जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश भरात रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे ह्या आजाराचे लोण पसरू नये म्हणून शासनाने राज्यातील अनेक गावातील यात्रा पुढे ढकलत आहे तर काही यात्रा रद्द सुद्धा केल्या गेली आहे याचा एक भाग म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात ता१३ मार्च ला बैठक पार पडली यावेळी बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक होते प्रमुख उपस्थिती जिल्हापोलिस आधीक्षक वसंत परदेशी,महंत बाबूसिंग महाराज,कबिरदास महाराज,तहसीलदार डॉ सुनील चव्हाण,जितेंद्र महाराज,पोहरादेवी सरपंच लक्षमीबाई खंडारे,उमरी खुर्द सरपंच पवार,यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार जगभरात हात पाय पसरवीत असताना राज्यात सुध्या रुग्ण आढळत पडल्यामुळे यात्रा महोत्सव मध्ये आजाराचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्व संमतीने उमरी खुर्द व पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोडक यांनी दिली देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक,टेलनगना, मध्य प्रदेश गुजरात राज्यातील भाविकांना यात्रेत येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन त्या त्या राज्यातील प्रमुख व जिल्हा स्तरावर माहिती देऊन यात्रा दरम्यान उमरी व पोहरादेवी येथे येऊ नये यासाठी प्रचार प्रसार करणार व महाराज यांनी सुद्धा आपल्या भक्तांना माहिती द्यावी असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले कोरोना व्हायरस या आजारामुळे राज्यातील औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा पाठोपाठ उमरी व पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याची वेळ पहिल्यांदाच आली असावी.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment