तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

पालम ग्रामिण रूग्णालय कोरोना आजार विषय सज्ज


आरूणा शर्मा
पालम  ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना या आजारावर मात करण्यासाठी पूर्व तयारी करण्यात आली. हया मध्ये ऑशेलेशन बेड आठ व विलगीकरन बेड दहा ची व्यवस्था करण्यात अली आहे हया आजाराची लागण इतर रुग्णांना होऊ नये या संदर्भात दैनंदिन जण जागरण करण्यात येत आहे. तसेच सर्वाना व्ययक्तिक स्वच्छते विषयी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यात येत आहे. हया आजाराची पूर्व तयारी म्हणून एकही अधिकारी व कर्मचारी यांना सुट्टी देण्यात आली नाही.  तसेच बाहेर देशावरून आलेल्या ची प्राथमिक तापसनी करण्यात येत आहे.आता पर्यंत पालम तालुक्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. या आजारावर पूर्व तयारी म्हणून पि.पि.ई ( PPE ) साहित्याची मागणी जिल्हा रुग्णालायला केली आहे. या सर्व पूर्व तयारी करण्याचे नियोजन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सिद्धार्थ भालेराव यांनी केले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रेमकुमार द्रोणाचार्य, डॉ.करवंदे, डॉ.विनायक वाखरडकर, डॉ.संदीप भस्के, श्री नीरज मुरुळे या सर्वांना सतर्क राहून 24 तास अत्यावश्यक सेवा देण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment