तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

सर्वांनी घरात थांंबूनच काळजी घ्यावी -आमदार लक्ष्मण


 पवार

सुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. २५ _ गेली दोन महिने कोरोनाच्या धास्तीने संपुर्ण जग हादरला. अचानक आलेले संकट परतवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दि.१४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन सुरू करून प्रत्येकाने आहे तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी संयम राखत आप आपल्या घरातच थांबावे जेणे करून दारात उभे असलेल्या महामारीला रोखणे शक्य होईल दरम्यान सर्वांनी घरात थांंबूनच काळजी घ्यावी असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी  केले आहे.
        पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनोचा विषाणूचा सामना करण्यासाठी गेवराई तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, विद्दुत विभाग, तहसील प्रशासन व नगर पालिका प्रशासन सज्ज झाले आहे तरी नागरिकांनी घाबरून न जाता आपआपल्या घरात थांबूनच कोरोनाचा सामना करण्यासाठी सतर्क रहावे व कोरोना विष्णानुचे प्रदुषण होऊ नये म्हणून गेवराई नगरपालिका यांनी दक्षता घ्यावी अशा सुचना आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेली आहे त्यामुळे गेवराई नगर पालिकाच्या वतीने आज पासून शहरातील गल्लो गल्ली साफ सफाई करून फोर्गीग मशीनद्वारे धुर फवारणीचे काम सुरू करून गेवराई शहरातील स्वच्छतेला सुरवात केली आहे तसेच कोरोना नांवाचा संकटाचा सामना करण्यासाठी गेवराई करांनी एकञ येऊन लढले पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या घरात थांबून रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment