तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणी करा-सुरेशभाऊ कांबळेमल्हार आर्मीचे 18 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण ; पञकार परिषदेत माहीती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- धनगर समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांची ही पुर्तता करावी.अन्यथा मल्हार आर्मीच्या वतीने 18 मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सूर्यकांत ऊर्फ सुरेशभाऊ कांबळे (संस्थापक अध्यक्ष-मल्हार आर्मी), बाळासाहेब ऊर्फ बाळूमामा बंडगर (कार्याध्यक्ष-मल्हार आर्मी) यांनी शुक्रवार,दिनांक 13 मार्च रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत दिली.


मल्हार आर्मीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलताना सूर्यकांत ऊर्फ सुरेशभाऊ कांबळे बाळासाहेब ऊर्फ बाळूमामा बंडगर यांनी सांगितले की,गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाची अनुसूचित जमाती (एस.टी) मध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी असून विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब  यांनी धनगर समाजाला शब्द दिलेला आहे की,धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू त्यामुळे धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. यासोबतच पुढील प्रमुख मागण्या अशा आहेत की, 1) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) मध्ये तात्काळ आरक्षण अमंलबजावणी
करण्यात यावी.,२) धनगर समाजाला घरकूल योजना लागू करण्यात आली आहे.त्या जाचक नियम व अटी शिथिल करुन आदिवासी घरकुल घटनेप्रमाणे लागू करण्यात यावे.,3) सारथी या योजनेच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विद्यार्थांना राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांसाठी ही योजना लागू करण्यात यावी. विद्यावेतन म्हणून प्रतिवर्षी  2,50,000/- रूपये देण्यात यावेत.,4) राज्यातील मेंढपाळावरील व महीलांवरील वाढते अत्याचार पाहता त्यांच्या स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावे.,5) धनगर समाजातील युवकांवरील आरक्षण आंदोलनात दाखल झालेले सरसकट गुन्हे तात्काळ माफ करावेत,4) तात्कालीन सरकारने धनगर समाजासाठी 1000/-हजार कोटी रूपये बजेट केले असून ते आपण 2,500/-हजार कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात यावे.राज्य सरकारने धनगर समाज एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करावी व प्रमुख मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अन्यथा बुधवार, दिनांक 18 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वाजल्या पासून "मातोश्री" या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती मल्हार आर्मीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत देण्यात आली आहे.पञकार परिषदेला प्रा. मस्के सर,गणपतराव देवकते, माऊली हरनाळकर,सुभाष मस्के,निळकंठ गडदे,व्यंकटेश चामनर,बापुसाहेब शिंपले,अॅड. दिलीपराव चामनर,कमलाकर बिडगर,शिवाजीराव काचगुंडे, बालासाहेब सोन्नर,प्रवीण बिडगर,गुणवंत बिरगड, किसनराव शिनगारे,सुखदेव देवकते,साहेबराव गडदे,गणेश नरवटे आदीं सहीत इतरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment