तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

वीज निर्मीती कंपनीत "ना कर्मचारी कपात ! "ना वर्क फ्रॉम होम" सहकार्याची भावना व सावधगिरी बाळगुन संघर्ष  मय परिस्थितीत अखंडीत विज निर्मिती करणे हाच पर्याय निवडुन कर्मचारी यानी बजावले आपले कर्तव्य

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित आशिया खंडतील नं.१ ची कंपनी म्हणुन नावलैकीक  आहे.आज पुर्ण जगातील व भारतात सर्व लोक कोरोना ह्या विषाणू  बरोबर लढत आहेत, युद्ध करत आहेत बचावासाठी व कोरोणा प्रसार होऊ नये म्हणून. केन्द्र व राज्य प्रशासनाच्या वतीने विवीध पर्याय सुचविले जात आहेत. मात्र उर्जा क्षेत्रातील विज निर्मिती कपंनी मात्र याला अपवाद ठरत असल्याचे मत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशन  संघटनेचे केन्द्रीय कार्यकारीणी सदस्य कॉ सुधीर मुंडे यानी केले आहे. विज निर्मिती  क्षेत्रात काम करणाऱ्या  तांत्रीक कर्मचारी व अधिकारी यांना  शासनाच्या ५० टक्के अथवा २५ टक्के उपस्थिती या धोरणाचा अत्य अवश्यक सेवेत येत असल्याने कुठलाही लाभ मिळत नाही. कंपनीच्या मानव संसाधन,व लेखा विभाग वगळता तांत्रीक कर्मचारी याचे नागरीकांना २४ तास वीज उपल्बध करून देणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते.. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी वीज उद्योगात  प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचारी व अभियंता याना कपातीचे धोरण लागु होत नाही.. विज निर्मिती कंपनी तील कर्मचारी आपल्या स्व:ताच्या जिवाची परवा न करता वीज  केंद्रात  अखंडीत विज निर्मिती करीत आहेत.याना समुहाने राहाने, एकोप्याने काम करणे,मिळुन काम करणे,या शिवाय पर्याय उरत नाही म्हणुन स्व:ताचे अरोग्य सभांळत असतानाच इतरांना साठी विज अखंडीत . मिळावी म्हणुन हे कर्मचारी जिवाचे राण करून काम करीत आहेत. अशा वेळेला सुरक्षात्मक काळजी घेण्या शिवाय त्याच्या जवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही. राज्यातील सर्व वीज  निर्मिती केन्द्रानी सुरक्षात्मक उपाय योजना राबवीत असताना परळी केंद्राच्या प्रशासनाने  कर्मचारी याना वारंवार सुचना देणे सावधगिरीचे उपाय सुचवीने, सुरक्षात्मक मास्क पुरवीने.ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी समुह टाळने,वीज वसाहती मध्ये कर्मचारी व त्याच्या पाल्य कुटुंबीयाना एकत्रीत येण्यापासुन वाचवीणे, मार्गदर्शन करणे, असे विविध  उपाय योजविले आहेत. परंतु विज उत्पादनात कुठलाही खंड पडु नये याचे नियोजन करण्यात आल्याने परळी केंद्रा सह राज्यातील सर्व विज केंद्रात  अखंडीत विज निर्मीती होत आहे. पण आज वीज निर्मीती कंपनीचे कामगार कर्मचारी अभियंता व अधिकारी "ना वर्क फ्रॉम होम" ना कर्मचाऱ्याची कपात"! सावधगिरी बाळगुन सघर्ष मय परिस्थितीत कर्तव्य करणे हाच पर्याय अति - आवश्यक  सेवेतील  हजारो वीज कर्मचाऱ्यांचे  योगदान अखंडीत चालु असल्याची माहीती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी  वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य कॉ सुधीर मुंडे यानी दिली.

No comments:

Post a Comment