तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

सेलूकरांच्या हितासाठी उपजिल्हाधिकारी पारधी रस्त्यावर उतरले


 कोरोना विषाणुचे गांभीर्य नकळालेल्या दाखविला हिसका.

सेलू :प्रतिनिधी


शहरात मागील चार दिवसा पासून
शासनाच्या वतीने लाऊडस्पीकर, शोषल मीडिया, बॅनर,पोस्टर,आदींच्या सहाय्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी जनजागृती संबंधी प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत  आहे परंतु शहरातील नागरिक अनावश्यकपणे घरा बाहेर पडून फिरत आहेत.या बाबतची माहिती कळताच
सेलूचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी आपल्या सोबत तलाठी, कार्यालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, यांना सोबत घेऊन शहरातील रस्त्यावर उतरून
बिनकामी फिरत असलेल्या नागरिकांना घरांची वाट दाखवून रस्त्यावरील गर्दी कमी केली.
उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी  रस्त्यावर उतरल्याची माहिती कळताच आणि त्यांनी व पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दाखविलेल्या हिसक्याने गर्दी कमी झाली होती. परंतु शहरातील पेट्रोल पंपाच्या पेट्रोल बंद झाल्याने पुन्हा पेट्रोल मिळण्यासाठी अनेकांनी धडपड करत वाहाने बाहेर काढून गर्दी केली.

No comments:

Post a Comment