तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 April 2020

लॉकडाऊन काळात वानसगाव येथील शिला बोकडेनि केलेले कार्य
आकाश लश्करे
उस्मानाबाद


नमस्कार,
मी शीला सुरेश बोकडे रा. वासनगाव, ता. जि. लातूर माझ्या संस्थेचे नाव स्वयं शिक्षण प्रयोग संस्था आहे या संस्थेअंतर्गत मी सखी अन्नसुरक्षा शेती कार्यक्रमात 60 अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोबत 20 जानेवारी 2018 पासून कृषी संवाद सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. या कार्यक्रमात माझ्या कामाचे स्वरूप शाश्वत शेती, व्यवसाय, अन्नसुरक्षा, महिला सक्षमीकरण व शासकीय योजनेचा लाभ घेऊन घेणे आहे.
माझे काम गाव पातळीवर अगदी सुरळीत चालू होते महिलांच्या घरी जाऊन ग्रह भेटी देणे त्यांना सेंद्रिय शेतीची माहिती देणे, त्यांना सेंद्रिय शेतीची माहिती देणे, गटाच्या बैठकीत घेणे, प्रत्येक गटात 20 महिला अशी तीन गट आहेत त्यांच्या शेतात जाऊन भेटी देणे, मार्गदर्शन करणे, लातूरची नियोजन बैठक अटेंड करणे तसे दुसऱ्या गावात गांडूळखत आणि अझोला बेड तयार करण्यासाठी माझ्या गावातील शेतकरी महिला घेउनजाणे त्यांना येण्याजाण्याचे तिकीट व जेवणाचा भत्ता संस्था देत असे.
अशा पद्धतीने माझे काम अगदी आनंदी चालू होते पण मध्ये जागतिक महामारीचे वादळ आले व माझ्या कामाचे स्वरूपच बदलून गेले. 20 मार्चला शासनाने लॉकडाउन च्या आदेशानुसार या दिवशी लातूर दिवसभर लॉकडाउन पाळले. दुसऱ्या दिवशी चालू होईल असे वाटले होते. पण परत एका महिन्याचे लॉकडाउन पडले व मग प्रश्न पडला काम कसे करावे व्हाट्सअप ग्रुप आमच्या संस्थेद्वारे तयार केला गेला सर्व kss  ना त्या ग्रुपमध्ये ऍड केले व मेसेज द्वारे कामाचे नियोजन केले व मग घरी राहून शासनाच्या नियमाचे पालन करून गावपातळीवर काम सुरू करा मग करून मग कोरोना ची लढाई जिंकण्यात मुंगीचा वाटा उचलावा मग मी करून हा आजार कशामुळे होतो व त्याची लक्षणे काय? यावर प्रतिबंध कसा करावा याचे मार्गदर्शन संस्थेमार्फत मोबाईलवर सांगितले होते तसेच काम गावात तुम्ही सुरु केले. माझ्या संस्थेच्या नावातच आहे की अगोदर स्वतः करणे व मग दुसऱ्याला शिकवणे यानुसार मी काम सुरू केले.
मी गावात 90 कुटुंबांना घरातील लहान थोर मंडळी एकत्र तीन फूट अंतरावर बसवून कोरोना होऊ नये यासाठी काय काय करावे याचे मार्गदर्शन केले. साबणाने दिवसातून सहा वेळेस 20 सेकंदात कशी धुवावी हे शिकवले. तोंडावर मास्क लावावा दोन व्यक्तींमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवावे हे सांगितले हे शिकवताना मला एवढ्या कुटुंबापेक्षा किती कुटुंब अतिगरीब आहे ज्यांची परिस्थिती 15 दिवसांनी खालवणार आहे हातावरचे पोट असणारे कुटुंब निवडून काढली काढली व त्याची यादी केली ती संस्थेला पाठवली अशी 40 कुटुंब निघाली.
मग मी ते शेतकरी महिलांना सांगितले की प्रत्येकाने आपल्या परीने या कुटुंबाला मदत करायची यांच्या शेतात भाजी आहे ज्यांचा उद्योग आहे अशा महिलांना व दुकानदार यांनी त्यांना मदत करावी मग मी 10 कुटुंबांना शेतातील मिरची दहा किलो, वांगी 20 किलो, कांदे 15 किलो, ज्वारीच्या पापड्या 20, किलो उडीद पापड 4 किलो व 18 किलो गव्हाची कुरवडी माझ्या हातात चांगली कला असल्यामुळे त्यांना बनवून द्यायचे ठरवले व ते दिलेही मोफत वाटप केले.
मग आमच्या गावातील बालाजी घोडके दुकानदार यांना मी अशी विनंती केली की त्यांनी खूप गरीब कुटुंबांना काही धान्य मोफत द्यावे व काही जणांना धान्य काही दिवसांसाठी उदार द्यावे मग त्यांनी दहा कुटुंबांना मोफत किराना 8000 हज़ार दिला व 15 कुटुबांना 15000 चा किराना एक           महीना उधारीवार सवलतिने योग्य दरात दिला मग मी बालिका कोम्पले पापड़ शेवाई उद्योग करणाऱ्या महीलेला या वार्षिक दर कमी करण्याची विनंती केलि मग त्यांनी 15 रुपय किलो शेवई व 45 रुपय तांदूळ पापड़ देत होत्या ते त्यांनी या लॉकडाऊन मधे सर्व  ग्रहकंना 8 रुपय किलो शेवाइ व 30 रुपय किलो पापड़ बनुन दिलि  त्यांचे 1 क्विंटल शेवाइ व पापड़ ज़हाली यांची व दुकानदार बालाजी घोड़के यांची मि मुलाखात घेऊन वीडियो बनवला
भुजंग पाटिल यांनी 300 कुटूबांना प्रतेकि 5 किलो तांदूळ या प्रमाने मोफत वाटप केले व तेहि आम्ही स्वत्ता ;प्रत्येक व्यक्तिस 3 फुटाचया अंतरावर शुनने अशि मार्किंग करून व तोंडाला मास्क लाऊंच राशन वाटप केले
ग्रामपंचायत मधील पुष्पाताई थोरमोटे, गोविनद लोभे, विट्ठल भेसाटे , व आपल्या गटाच्या अधेक्ष जयश्री गोबाड़े व सचिव सुनीता करे या त्या मीटिंग मधे पाठविले व कोरोना समिति तयार करून नियोजन केले की पानी प्रत्येक घरि पोचावे जेने करून सोशल डिस्टेन्स चे पालन होवे. सर्वांना पानी भेटेल तर ते बाहेर पडणार नाही व एकत्रित ऐनार नाही त्या मुले कोरोना चा आज़ार टलु शकेल व गाव सुरक्षित ठेउ शकाल .
 मी स्वतः आशा कार्यकर्तीस आरोग्य चि तपासनि कुठे होते पुन्या हुन आल्या लोकचि 
तापसनि झाली पाहिजे व त्यांना 15 दिवस घरातच राहावे अशि व्यक्ति पुन्याहुन आलेलि मी त्यांना जाऊन सांगितले .
आमच्या संस्थेच्या वातिने राज भाउ सर, तब्बसुम मॅडम, सारिका मँडम, मी  चयेम्पियन महिला  व गावातील कोरोना नियोजक व्यएक्ति त्यांच्या वातिने आपल्या देश्या चे रक्षक, अरोग्य, सेविका, डॉक्टर, पुलिस व घरहनि ज्यांनी कुतुम्बाचे व्यक्ति एकत्रित सुखी राहावे त्यंचया साठी त्यांची सेवा केलि यांची आभार मानते.
 व ज़ताज़ता परत संगते आता तारि सवाध व्हा जेने करुन देशा वरिल जागतिक महामारी कोरोना  सरखे संकट देशा वर ज़ाले याला तोड देन्या साठी कमीत कमी आपले अरोग्य चांगले राहावे रोग प्रतिकारक शक्ति वाढावि यासाठी रासायनिक सोडून सेंद्रिय अन्न खा सेंद्रिय शेति करा लहान थोर व्यक्तिन्न विष् मुक्त अन्न खा देश वाचवा प्रतिकार करा मग लड़ाई आपनच जिंकनार

अन् त्यां कुटुंबांच्या दारात बहरला "वसंत" ...


जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कर्तव्य पलीकडेची माणुसकी

 तळ हातावर जीवन जगणाऱ्या कुटुंबाला  स्वता जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या

वाशिम(फुलचंद भगत) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवरील लॉकडाऊन व संचार बंदीतही विविध समाजसेवी संस्था आरोग्य,पोलीस कर्मचाऱ्यायांसह निराधारांच्या मदतीला धावून आल्या़ परंतू या समाजेसेवींच्या नजरेतून सुटलेल्या  शहरातील आणि शहराबाहेरील  अनेक गरजुवंत व त्याच बरोबर गावो  गावी फिरून टोपली सूप फडे विकणारी,भांडे विकणारी,मनी पोत डोरले विकणारे,ज्यांच्या उदरनिर्वाह रोजच्या मजुरी वर आवलंबून आहे  व पालात राहणारी  कुटुंबियांच्या व्यथा वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा  पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाच्या दारी साक्षात "वसंत फुलला" हे  म्हणायला वावगे ठरणार नाही... वसंत परदेशी यांनी आपल्या रोजच्या पेट्रोलिंग मध्ये अनेक वेळा या गोर गरीब  कुटूंबाच्या व्याथ्या अगदी जवळून पहिल्या  स्वता यांच्या फडावर,वस्तीवर  आपल्या तफ्या सह जाऊन त्यांची सध्याची जीवन चर्या जाणून  घेतल्या़ जागतीक महामारीत काही सामाजिक संस्थांना सोबत घेऊन या वस्त्यांमधील गोरगरीब कुटुंबांना आरोग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरसोबतच अन्नधान्याचे दि.२ एप्रिल पासून आजवर किमान ९,६४९ धान्य व किराणा असलेल्या किटचे  वितरण करुन त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवून खाकीतील माणुसकीचा परिचय दिला़ 
गावोगावी जाऊन छोट्या छोट्या वस्तू ,टोपली सूप फडा विणून,मनी डोरले पोत, व काही  रोजचा  व्यवसाय अनेक महिला व पुरुष  पोटाची खळगी भरण्यासाठी करीत असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही़ मात्र, कोरोना विषाणूचा प्रकोप वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून या अश्या लोकांकडे त्याच्या छोट्या वस्त्याकडे माणुसकीच्या बाता मारणार्याची मदत पोहचू शकली नव्हती़ परिणामी, या अश्या वस्त्या मधील चिमुकले मदतीच्या अपेक्षेने रस्त्याकडे डोळे लावून बसलेले दिसून येत होते़ मात्र, कर्तव्य कठोर विभाग म्हणून परिचित असलेल्या पोलीस विभागात माणुसकी शिल्लक् असल्याचा परिचय व आपण माणूस म्हणून ज्या  समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचे ऋण फेडणे आपले आंध्य कर्तव्य आहे,हे ज्यांना कळले ते म्हणजे  आपल्या नावातच वसंत असणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने दिला. वसंत परदेशी यांनी या कुटुंबियांना मास्क व सॅनिटायझर देण्यासोबतच त्यांच्या दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था करुन खाकीतील माणुसकीचा परिचय दिल्याची भावना या गरजू कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून आली़.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

परमपूज्य डॉ संत भय्यूजी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त जनावरांसाठी पाण्याच्या हौद चे वाटप


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-परमपूज्य राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त  पशुपक्ष्यांना मुक्या  जनावरांना पाणी पिण्यासाठी  हौदाचे चे वाटप व उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ‌तहसिलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते या हौदाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले, सुर्योदय परिवार चे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले की,आज कोरोणाच्या या संकटात माणूस एकमेकांची मदत करताना दिसत आहेत तसेच लाॅकडाऊन व उन्हाळ्याच्या या दिवसात मुके प्राणी,पक्षी यांच्या चारा, पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे अशावेळी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून इतरांनीही असे उपक्रम राबवावे असे आवाहन केले
 यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा संघटक अशोक गाढवे, माजी तालुकाप्रमुख सुहास मोहिते, उपशहर प्रमुख गणेश जाधव, विनोद पोखरकर, रवी मुडेगावकर आदींची उपस्थिती होती.
अर्जुन वाघमारे हे मागील अनेक वर्षांपासून सुर्योदय परिवारात भैयुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हौद वाटप, धान्य वाटप,गोशाळेस चारा वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात परंतु दुर्दैवाने भैयुजी महाराज यांचे निधन झाल्या नंतरही त्यांच्या पश्चात ही असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवचेतना विकास केंद्राच्या माध्यमातून दिला पारधी समाजाला आधारकेज (प्रतिनिधी) :-  केज तालुक्यातील चिंचोली माळी जवळील एका पारधी समाजाच्या वस्तीवर भर दुपारी दोन महिला जातात. तेथील दृश्य पाहून त्या अचंबित होतात. अगदी दोन महिन्यांपासून ते बारा तेरा वर्षा पर्यँतीची मुले ही उघडी नागडी असल्याचे दिसते. भर उन्हातही अगदी अनवाणी पायाने आणि तळपत्या उन्हात ती फिरत आहेत. अशीच अवस्था महिलांची आणि वृद्धांची सुद्दा; पत्र्याच्या शेडमध्ये केवळ निवारा असावा म्हणून तेवढाच आसरा. वस्तीवर कुठल्याच मूलभूत सुविधा नाहीत. त्यातही कहर म्हणजे कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या भीतीने त्याचा संसर्ग फैलावू नये म्हणून देशात लोक डाऊन असल्यामुळे या आदिवासी भटक्या कुटुंबाची होत असलेली उपासमार. याची माहिती काही पत्रकारांच्या मार्फत नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सौ. मनिषाताई घुले आणि त्यांच्या सहकारी सौ विजयाताई कांबळे यांना समजली होती. त्यावरून त्या दोघी भर उन्हात एका टेम्पोत जीवनावश्यक वस्तू त्यात अगदी चांगल्या प्रतीचे गव्हाचे पीठ, तेलाचा डब्बा, तांदूळ, साखर, चहा पावडर, शेंगदाणे, अंगाच्या व कपड्याच्या साबून, रवा, मैदा, बिस्कीट, मिरची पावडर, हळद, मसाला, खोबऱ्याचे तेल, उपीट व शिऱ्याचे पौष्टिक अशा आहाराचे बंद पॅकेट आदी सर्व साहित्य या आदिवासी पारधी समाजाच्या चिंचोली माळी ता . केज येथील पालावर जाऊन वाटप केले. मात्र याचा ना कुठे गवगवा ना गाजावाजा न करता दहा कुटुंबाना सर्व साहित्य वाटप केले. यावेळी त्या भटक्या समाजातील कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. यावेळी मनिषाताई घुले, विजयाताई कांबळे, ज्योती सांबरे, पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते." आता पुढे पालावर जाऊन महिला व मुलांच्या कपड्यांची मापे घेऊन त्यांना कपडे वाटप करण्याचा मी निरधार केला आहे. "

        मनिषाताई घुले," पालवर राहणारी आदिवासी समाजातील लोक सुद्धा आपले देश बांधवच आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना शक्य होईल ती मदत केली. "

विजयाताई कांबळे


संकटाच्या वेळी मदत करण्याचे सोडून आपल्या घरात बसलेल्या श्रीमंतीचा तोरा मिळविणाऱ्या मोठ्या लोकांपेक्षा मनिषाताई व विजयाताई यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

व्यवसायिक कुंभार समाजावर कोरोना व लाॅकडाउनमुळे उपासमारीची वेळ ; कोरोना व्हायरस ने आणली बारा बलुतेदारांवर ऊपासमारीची वेळ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 पूर्ण जगावरच आपत्ती बनून  आलेल्या कोरोनाव्हायरस या जीवघेण्या रोगाने जगातील अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले असून अनेक पारंपरिक व्यवसाय करणारांवरही उपासमारीची वेळ कोरोनाव्हायरस मुळे आली आहे. महाराष्ट्र राज्यात आणि मराठवाड्यात असेच पारंपरिक व्यवसाय करणारे बारा बलुतेदारांचे व्यवसायही अडचणीत येऊन कोरोनामुळे असा व्यवसाय करणारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बारा बलुतेदारांपैकी एक असलेला व्यवसाय म्हणजे कुंभारकी होय.

पुर्वी शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय व जीवनावश्यक मदतींसाठी जे बारा बलुतेदार होते.त्या बारा बलुतेदारांमध्ये कुंभार समाजाची व कुंभारकि व्यवसायाची शेतकऱ्यांना मोलाची मदत होत असे.कालांतराने फ्रिज,पिण्याच्या पाण्याचे जार,चिनी मातीचे भांडे व इतर आकर्षित करणारे रेडीमेड पर्याय आल्याने आणि कुंभारकि व्यवसायातून उत्पन्न कमी झाल्याने वरचेवर हा व्यवसाय अडचणीत येऊ लागला.यामध्ये सरकारचे वारंवारचे दुर्लक्षही कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅक डाऊन असल्याने कुंभार व्यवसायाची काय अवस्था आहे,  याविषयी जाणून घेण्यासाठी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील परंपरागत कुंभार व्यवसाय करणारे श्री.नारायण कुंडलिक मुरगीरकर यांची पत्रकार अनंत गित्ते यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कुंभार व्यवसायावर कोरोनामुळे काय परिणाम झाला,याविषयी जाणून घेतले असता श्री.नारायण मुरगीरकर यांनी सांगितले की पूर्वी कुंभारकी व्यवसायावर संसाराचा गाडा आनंदात चालत असे.

परंतु कालांतराने फ्रीज,पिण्याच्या पाण्याचे जार,दिवाळीत लागणाऱ्या रेडीमेड पणत्या,चिनी मातीचे भांडे अशा अनेक रेडिमेड वस्तूमुळे कुंभारकी व्यवसाय अडचणीत आला असून गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये परंपरागत असणाऱ्या या व्यवसायाकडे अनेक समाज बांधव पाठ फिरवत आहेत.जे तग धरून हा परंपरागत व्यवसाय करत आहेत त्यांनाही कोरोना व्हायरस व लॉक डाऊनमुळे आज अडचणीत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ कोरोनाव्हायरस मुळे आली असल्याचे नारायण मुरगिरकर यांनी सांगितले.

सध्या रेडिमेडच्या या जमान्यात फक्त मकर संक्रातीचे सुगडे,उन्हाळी माठ विक्री,असे वर्षातून फक्त दोनच वेळा कुंभार व्यवसायाची थोडीफार चलती असते.परंतु कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊन यामुळे कुंभारकी व्यवसायच बंद पडला आहे.

नारायण मुरगिरकर पुढे सांगतात आज कुंभारकी व्यवसाय करण्यासाठी माती,घोड्यांची लीद,माठ-गाडगे भाजण्यासाठी लागणारे जळण-सरपन, पाणी असे बरेच काही विकत घ्यावे लागते. आणि मग मेहनत करून गाडगे वगैरे तयार होतात.लाॅकडाऊन'मुळे गत दीड महिन्यापासून वाहतूक ठप्प असल्यामुळे ह्या सर्व वस्तू विकत घेणे दुरापास्त असल्याने आणि विक्री करण्यासाठी बाजारच बंद असल्याने आज कुंभार व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असून परंपरागत व्यवसाय करणाऱ्या अनेक कुंभार समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे  म्हटले.पुर्वी शेतकऱ्यांनी दिलेल्या बलूत्यावर व मकर संक्रातीला झालेल्या सुगडे विक्रीतून वर्षभराचा उदरनिर्वाह होत असे.आज गावोगाव एक ते दोन कुंभार समाजाचे घरे तर  काही गावांत आठ ते दहा घर,कुटुंब संख्या असून फ्रिज,पाण्याचे जार, रेडीमेड दिवाळी पणत्या यांसह अनेक प्रकारच्या रेडीमेड वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास अडचणीत  आल्यामुळे गेल्या दहा ते  पंधरा वर्षांमध्ये परंपरागत असलेल्या या व्यवसायातून अनेक समाज बांधव बाहेर पडले व पर्यायी काम धंदे शोधू लागले.यातूनच अनेक समाज बांधव मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार बनले आहेत.अशी खंतही मुरगीरकर यांनी व्यक्त केली.

पूर्वीच्या काळी कुंभारकी व्यवसायात अनेक मातीच्या उपयोगी वस्तू तयार होत असत.यात मकर संक्रातीचे सुगडे,बोळ्या,छोटे गाडगे, लोटके,चिटकी(वरण शिजवण्यासाठी),ताक करण्यासाठीचे डेरे,दही करण्यासाठीचे मोरवे,पिण्याच्या पाण्याचे डेरे,कोतळ्या, रांजण,बैल पोळ्याचे आळंद,दिवाळी पणत्या,वेळ अमावस्या साठी लागणारे आंबील घुगरी मोरवे, खळ्यावर लागणारी घागर,नवरात्री घटस्थापनेचे लोटके,शेतात जेवण्यासाठी लागणारे खोले,अक्षय तृतीया पूजेसाठी लागणारे कळसा-बिनगी,उन्हाळी माठ यांसह मातीच्या अनेक वस्तू पारंपारिक व्यवसाय करणारे कुंभार समाज बांधव तयार करत असत.रेडिमेड वस्तूंमुळे यातील बहुतांश वापरातील वस्तू विस्मरणात गेल्या आहेत.

ज्या काही थोड्या फार वस्तू परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व  या व्यवसायात तग धरून असलेल्या कुंभार समाज बांधवांकडून तयार करण्यात येतात,अशा व्यवसायावरही कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊन मुळे या व्यवसायावर मोठे संकट आले असून अनेक कुंभार समाज बांधवांवर उपासमारीची वेळ कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊन मुळे आली आहे. आज कुंभार व्यवसाय करण्यासाठी माती-पाणी,सरपन अशा अनेक वस्तू खरेदी करून उन्हाळी माठ,रांजण,कोतळ्या वगैरे तयार करावे लागते.परंतु कोरोनाव्हायरस आणि लाॅकडाऊनमुळे अगोदरच रेडीमेडच्या जमान्यात अडचणीत असलेल्या या व्यवसायावर मोठे संकट ओढवले असून या व्यवसायाला व हा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुंभार  समाजबांधवांना शासन मदतीची गरज आहे.

    

कोरोनाव्हायरस व लाॅक डाऊनमुळे आज अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले असून,बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या कुंभार व्यवसायावरही मोठे संकट कोरोनाव्हायरस व लाॅकडाऊन मुळे ओढवले आहे.अगोदरच रेडिमेड वस्तूमुळे फ्रीज,पाण्याचे जार यामुळे उन्हाळी रांजण,माठ,कोतळ्या.गॅस मुळे खापरी चुली.रेडीमेड दिवाळी पणत्या अशा अनेक रेडिमेड वस्तूंमुळे कुंभार व्यवसायातून तयार होणाऱ्या बहुतांश वस्तू ह्या विस्मरणात गेल्या आहेत.ज्या काही वस्तू आज या व्यवसायातून तयार होतात,त्यांच्यावर कोरोनाव्हायरसने मोठे संकट उभे केले आहे अशा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदार व कुंभार व्यावसायिकांना शासन मदतीची आज गरज आहे.

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !


बीड (प्रतिनिधी) कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवाचे व्हायरस जीव घेणे ठरत आहेत याला रोखने हे पोलिसांसमोरील आवाहन आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून फेसबुक व्हॉट अँप वर अफवा पसरवणारे समाजकंटक काही कमी नाहीत,अशा अफवाखोरराना बीड पोलिसांनी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. सोशल मीडिया संदर्भात महाराष्ट्रात २५० गुन्हे नोंद आहेत पुणे -२० मुंबई-१८ तर एकटया बीड जिल्ह्यात सर्वात जास्त २८ गुन्ह्याची नोंद आहे , यामुळे आता बीड मधून अफवाखोर हद्दपार होण्यास ही ब्रँच परिणामकारक ठरली आहे. २४ तास समाज माध्यमावर लक्ष ठेवनारी बीड पोलिसांची तिसरी सायबर ब्रँच कामगिरी केली आहे.

फेसबुक,व्हॉट अप ,ट्विटर टिक टॉक ,यासह इतर माध्यमावर पोस्ट टाकण्या पूर्वी आणि शेअर करण्यापूर्वी ही बातमी पहा. रिकामा उद्योग करत पोलिसाचे काम वाढवनारे महानग बऱ्याच वेळा अमुक अमुक गावात कोरोना चा रुग्ण सापडला. न्यूज पेपर आणि खोट्या बातम्याचे फोटो स्किन शॉट व्हाट्स अँप वर फिरल्यामुळे अनेक अनर्थ घडले, बीड मध्ये लॉक डाऊन च्या सुरुवातीला अफवांच पेव फुटले होत. हे रोखण्यासाठी बीड पोलिसांनी सायबर टीम तयार केली यात एक अधिकारी आणि सहा कर्मचारी अशी चोवीस तास बीड जिल्हयातील सोशल माध्यमावर लक्ष ठेवून आहेत कालपर्यंत (२९ एप्रिल) जिल्हयात २८ गुन्हे दाखल झाले आहेत,तब्बल ३१अफवा खोरावर कारवाई केली असे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितले.                                     कोरोना सोबत लढाई लढताना त्यापेक्षा खतरनाक अफवाचा व्हायरस आहे, यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना अगोदर खात्री करावी यातून समाजच नुकसान होणार तर नाही ना असा प्रश्न स्वतःला विचारा डोळेबंद करून गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून कोणतेही पोस्ट टाकू नका. अन्यथा कारवाई आणि जेल तुमची वाट पाहतोय असा इशारा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी दिला. बीड पोलिसांचा तिसरा डोळा सोशल माध्यमातील हालचालीवर बारीक लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियाचा प्रोफाइल तुमचा असलं तरीही मात्र तुम्ही समाजामध्ये वावरत आहे याचे भान राहू द्या कोरोना सारख्या कठीण काळात सामाजिक द्वेष खोट्या बातम्या आणि अफवांचे पेव फोडाल तर याद राखा असा इशाराच बीड पोलीस देत आहे.

बँकासह सुट देण्यात आलेल्या सर्व कामांशी संबंधित व्यक्तींना पास आवश्यक- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सुट देण्यात आलेली आहे आणि भविष्यात सुट देण्यात येईल अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना पास सध्या चालू असलेल्या covid१९.mahapolice.in या वेबसाईटच्या आधारे घेता येतात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
           परंतु सदरील संकेतस्थळावर अर्ज करतांना संबधित शासकीय नियंत्रण अधिकाऱ्याचे लेखी शिफारस असणे आवश्यक आहे.  यासाठी नियंत्रण अधिकारी याच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील बँकेमध्ये याप्रमाणे पास उपलब्ध असलेल्या व्यक्तींना देखील विषम तारखेस सकाळी ०७.०० ते सकाळी ०९.३० या वेळेतच बँकेशी संबंधित कामाला मुभा दिली जाते. या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही सोई-सुविधा पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना देखील देण्यात येत नाही.
         जिल्ह्यतील सर्व बँकांनी याप्रमाणे पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बँकेच्या सर्व सोई-सुविधा या संचारबंदी काळातही बँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलबध करून द्याव्यात.
        याआदेशासह यापूर्वीचे सुधारीत आदेश, सुधारणा आदेश अमंलात राहतील असे निर्देश दिले आहेत.

डाॅक्टर सेलचे प्रदेश संघटक डाॅ.रोशन बंग यांनी केले फेस प्रोटेक्शन शिल्डचे वितरण


वाशिम(फुलचंद भगत)-राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने वाशीम जिल्हासाठी १ हजार फेस प्रोटेक्शन शिल्ड देण्यात आल्या.हे वितरण राष्टवादीचे डाॅक्टर सेलचे प्रदेमश संघटक डाॅ.रोशन बंग यांच्या हस्ते वितरण करन्यात आले.या ऊपक्रमासाठी डॉ. नरेंद्र काळे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष  चंद्रकांत  ठाकरे व राष्ट्रवादी वाशीम ची संपूर्ण डॉक्टर सेल टिम प्रयत्नशील होती. या फेस शिल्ड चे डॉक्टरांना वितरण करताना डॉक्टर सेल चे प्रदेश संघटक डॉ. रोशन बंग यांनी सांगीतले की कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनसामान्यासोबतच डाॅक्टरांच्याही सुरक्षिततेची काळजी घेणे महत्वाचे आहे त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल असु.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

चंदुलाल बियाणी यांच्या वतीने माहे रमजानचे कार्ड वितरण शहरातील 5 हजार मुस्लीम बांधवांना वेळापत्रकाचे वितरण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभुमीवर दररोजची सहेरी व इफ्तार संदर्भातील अद्ययावत वेळापत्रक पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांच्या वतीने आज वितरीत करण्यात आले. सुमारे 5 हजार प्रतींचे वितरण शहरातील विविध भागात मुस्लीम बांधवांना करण्यात आले आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना नुकताच सुरु झाला असून या कालावधीतील दररोजचा इफ्तार आणि सहेरी याच्या बदलत्या वेळा असतात. दररोजचा उपवास करतांना या वेळापत्रकाचा उपयोग असून या वेळापत्रकात संपुर्ण महिनाभरातील सहेरी आणि इफ्तार यांच्या वेळा तारिख, वार नुसार देण्यात आल्या आहेत. आज विशेष व्यवस्थेमार्फत शहरातील 5 हजार मुस्लीम बांधवांना या   वेळापत्रकाचे वितरण करण्यात आले. नगरसेवक चंदुलाल बियाणी मागील अनेक वर्षापासून रमजान कार्ड वितरणाचा उपक्रम राबतिव आहेत.

परळी तालुक्यातील पशुधनाची तपासणी ; लंपी इन्फेक्शनमुळे जनावरे आजारी
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
     लिंपीस्किन व्हायरल इन्फेक्शन हा पशूधनांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगासंदर्भात
दै.सकाळने सोमवारी (ता.२७) बातमी प्रसिध्द करताच मंगळवारी (ता.२८) गाढे पिंपळगाव परिसरातील पशूधनांची तपासणी करण्यात आली. 
          तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गाई-बैल या जनावरांमध्ये नेहमीपेक्षा वेगळा व गुढ असा आजार झाल्याचे आढळून येत आहे. गुरांना गुढ आजाराची लागण झाल्याने पशुपालक धास्तावले होते. जनावरांच्या अंगात ताप येणे, अंगावर गाठी व गळ्याला सूज येत असून जनावरे चारा पाणी घेत नाहीत. ही लक्षणे आढळून आली आहेत. या गुढ आजारांमुळे पशू मालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात दै.सकाळने बातमी प्रसिध्द करताच तालुका पशूवैद्यकीय प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्वात जास्त प्रभाव असलेल्या गाढे पिंपळगाव मध्ये सिरसाळा विभागातील पशूवैद्यकीय डॉ. कोळी यांनी आपल्या टिमसह गावातील पशूधनांच्या तपासणीला सुरुवात केली आहे.
डॉ. कोळी यांनी सांगितले की, हा संसर्गजन्य आजारामध्ये जनावरांना ताप येते, कमजोर होतात, पाणी कमी पितात, खाणे कमी जाते, संपूर्ण शरिरावर गाठी येतात. गोचीड व चावणाऱ्या माशा यांच्या पासून इतर जनावरांमध्ये हा रोग पसरतो, फक्त दोन टक्के मरतूकीचे प्रमाण आहे. दोन ते तीन आठवड्यात या जनावरांचा आजार बरा होवू शकतो. प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू करण्यात येत असून गोचीड निर्मूलन, चावणाऱ्या माशांना रोखणे या जनावरांना प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी चांगला पोष्टीक आहार देण्यात येत आहे. पशू मालकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे डॉ. कोळी यांनी यावेळी सांगितले.

कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!


·  लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन

·        शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी

·  मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस

बुलडाणा,  दि. 30 :

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.

   बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत  तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.

  लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी  झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.

असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन

जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर :  2.53, धनवटपूर ता. मेहकर :  2.77, धानोरी ता. चिखली  :  1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1,  धामणगांव बढे ता. मोताळा :  4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी  ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख  ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद :  3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे.  अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.

वाशिम मधील यसोलेशन कक्षात दाखल तीन व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’


सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांची माहिती

 वाशिम, दि. ३० (फुलचंद भगत) : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलेल्या तीन व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने काल, २९ एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही.
     अमरावती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती, वसई-पालघर येथून जिल्ह्यात आलेली एक व्यक्ती आणि ताप व खोकला अशी लक्षणे असलेली एक व्यक्ती अशा एकूण तीन व्यक्तींना काल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
     जिल्ह्यात सध्या ५५ व्यक्तींना गृह विलगीकरणात तर १४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ४९ घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४८ अहवाल निगेटिव्ह आले तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एकमेव कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचारानंतर त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. सदर व्यक्तीला २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही, असे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्येकाने दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल ; १ मे - महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा


बीड (प्रतिनिधी) :-  उद्या शुक्रवार दि. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो; सध्या कोरोना या वैश्विक महामारीविरुद्ध सबंध महाराष्ट्र लढतो आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे न होऊ देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, त्या सर्व हुतत्म्यांना नमन करून कामगार चळवळी मध्ये योगदान दिलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, असे ना. मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 

कोरोना विरुद्ध सगळे जग लढत आहे. महाराष्ट्राची लढाई निर्णायक टप्प्यात आली असून रुग्णांचा आकडा आता १० हजारच्या पार जातोय, या परिस्थितीत राज्य शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असून, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. समाजातील अनेक संस्था व अन्य घटक शासनाच्या बरीबरीने गरजूंना अन्न - धान्यासह विविध प्रकारची मदत करत आहेत. एवढेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक शासकीय सूचनांचे पालन करत आपापल्या परीने कोरोनाविरुद्ध लढत आहे.

कोरोना विरुद्ध च्या लढ्यात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने दिलेले हे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल; महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीसाठी लढा दिलेल्या सर्वांसमोर नतमस्तक होऊन राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्याचा 'शून्य' कायम राखण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी या पुढील काही दिवस आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागणार असून, आपलेच बांधव म्हणून परत आलेले ऊसतोड कामगार यांचीही काळजी करावी काळजी घ्यावी. बीडचा 'शून्य' अबाधित ठेवण्याच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हावासीयांनी योगदान द्यावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार


मुंबई (प्रतिनिधी) :-  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे. 

जिल्ह्यांचे नोडल अधिकारी  त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते  ठरवतील. 

जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक करण्यात आले आहे. 

ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक असेल. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे  देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमती पत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झीट पास असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक आहे. 

पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणारा आहे. वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळायचे आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल याची दक्षता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी. आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर  सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जन कल्याण समिती परळी तर्फे कृष्णनगर परिसरातील


 गरजू कुटुंबांना मदतीचा हात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- गुरुवार (30 एप्रिल 2020)सध्या देशामध्ये आलेल्या कोरोना च्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संगठना मदत कार्य करीत आहेत.
        आपलीही सामाजिक बांधिलकी म्हणून परळी शहरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,जनकल्याण समिती यांच्यातर्फे कृष्णनगर भागातील ५१ व इतर १२ एकुण ६३ गरजू व निराधार कुटुंबांना मदतीचा हात म्हणून १५ दिवस पुरेल अश्या प्रकारचे अन्नधान्य व जीवनावश्यक १३ वस्तूंचे किट कृष्णनगर भागातील ज्ञानबोधिनी शाळेमध्ये सोशल डिस्टनसिंग आणि शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करीत वाटप करण्यात आले.
        या मदत कार्यात परळीतील स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. किट वाटप करण्यामध्ये सत्यमेव जयते या सामाजिक संस्थेने सहकार्य केले.                                         
        अश्या प्रकारच्या  सामाजिक कार्यात आपणही काही करावे असे अनेकांना वाटत असते पण काही कारणास्ताव त्यांना थेट मदत करणे शक्य नसते अशा  नागरिकांनी  आपल्या पध्दतीने  प्रल्हाद बिडगर-9561767877
सुशील येळाये-9665212295
दिनेश लोंढे-9975934730 या क्रमांकावर संपर्क साधून आपले योगदान देऊन आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

_महिलेने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी.._ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार


बुलडाणा: 30 
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड नंबर 03 मध्ये उपचार घेत असलेली एका महिलेने नवीनच उभी होत असलेली एका दुमजली इमारती वरून उडी मारली असता, तिला याक्षणी OPD मध्ये भरती केले आहे.

या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिलेल्या माहितीवरून सदर 35 वर्षीय महिला मनोरुग्ण म्हणून देऊळगावराजा वरून उपचारासाठी आली असता आज गुरुवार 30 एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तिने आयुष्य बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारली तिच्या पायाला व पाठीला इजा झाली असून पुढील उपचारार्थ तिला अकोला येथे रेफर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सदर महिलेने कोरोना चाचणी होणार असल्याच्या भीतीने उडी मारली असल्याची रुग्णालय परिसरात जोरदार चर्चा सुरू होती !

सिरसाळा ग्राम रक्षक दलाच्या अध्यक्ष पदी अँड.सतीश काळे यांची निवड
सिरसाळा (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीचा प्रदुभाव रोखण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतीला ग्राम रक्षकदल स्थापन करण्याचा आदेश दिल्यानंतर सिरसाळा ग्रामपंच्यातने ग्राम रक्षक दलाच्या समिती आज दि 29 रोजी च्या ग्रामपंचयतच्या बैठकीत सर्वानुमते  अध्यक्षासह 25 सदस्य त्यात महिला 5 सदस्य समिती सरपंच पु राम किरवले, ग्रामसेवक शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली या समितीच्या रक्षक दलाच्या अध्यक्ष पदी अँड सतीश काळे, सदस्य पदी,भय्या कांबळे, व्यंकट काळे, असेफ पठाण, अजहर पठाण, जावेद इनामदार,रणजित रोडे,विलास उजगरे, बाळासाहेब किरवले,प्रथमेश देशपांडे, शेख अन्वर,दिलीप मिसाळ,शमीम तांबोळी,आखेब बागवान,वंदना गोदाम,नीता गायकवाड, कल्पना काळे,अनिता दहिवाळ, प्रफुल ललवाणी,सुमित किरवले,राम क्षीरसागर,शेख फय्युम,वसीम पठाण, शेख उमेर,जावेद पठाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचीत अध्यक्ष व सदस्य सदस्या यांना ग्रापंचायतच्या सरपंच पु राम किरवले यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने आमच्यावर टाकलेली जवाबदारी आम्ही योग्य रीतीने पार पाडून गावाच्या हितासाठी नेहमी तत्पर राहू असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

अंबाजोगाईत संकल्प क्लासेसच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मोफत ऑनलाईन' क्लासेसचे आयोजन - प्रा. नारायण सिरसाठ यांचे सामाजिक भान.....!


 अंबाजोगाई (प्रतिनिधी)  :-                                                                                               सध्या कोरोनाच्या जागतिक महासंकटाने सर्वत्र भितीच वातावरण तयार झालं आहे.त्यामुळे देशातील व राज्यातील सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. आणि येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडेल याची शक्यता देखील नाकारता येत नाही.इतर क्षेत्रांप्रमाणे अतिशय महत्वाच्या शिक्षण क्षेत्रावर देखील कोरोनाचा मोठा प्रभाव झाला आहे.सर्व शाळा,महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी अमर्यादित काळांसाठी बंद राहतील अस स्पष्ट चित्र दिसत आहे..पण आयुष्याच्या नेमक्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेल्या दहावीच्या विध्यार्थ्यांना कोरोनासोबतच अभ्यासाची भीती भेडसावत आहे.कारण पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत दहावीच्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सर्व विषयांची ओळख आणि दहावीचा अभ्यास कसा करावा याच मार्गदर्शन उन्हाळी बॅचेस मधून मिळालं असत पण तसं झालं नाही परिणामी विध्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत.याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जोपासत अंबाजोगाई येथील संकल्प मॅथ्स क्लासेस चे संचालक प्रा. नारायण सिरसाठ यांनी अंबाजोगाई परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मॅथ्स  क्लासेसचे आयोजन केले आहे.

        याबाबतीत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई येथील संकल्प क्लासेसच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबविले जातात.सध्या संबंध जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असुन भारतात व महाराष्ट्र राज्यातही कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात जाणवत आहे. पूर्ण देश लॉकडाऊन असुन या पार्श्वभूमीवर इतर क्षेत्रांप्रमाणे अतिशय महत्वाच्या शिक्षण क्षेत्रावर देखील कोरोनाचा मोठा प्रभाव झाला आहे.सर्व शाळा,महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी अमर्यादित काळांसाठी बंद राहतील अस स्पष्ट चित्र दिसत आहे.या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा वरती परिणाम होऊ नये म्हणून खास पालकांच्या आग्रहास्तव आणि विध्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत येथील संकल्प क्लासेसचे संचालक प्रा नारायण सिरसाठ यांनी संकल्प मॅथस क्लासेसच्या वतीने परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "मोफत ऑनलाइन  क्लास" हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती दिली.यामध्ये विध्यार्थ्यांना बीजगणित(algebra) आणि भूमिती(geometry) या विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सोबतच ऑनलाइन परीक्षा देखील घेण्यात येणार आहेत.तरी या पूर्णपणे मोफत असणाऱ्या ऑनलाइन क्लासचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संकल्प मॅथस क्लासेसचे संचालक प्रा.नारायण सिरसाट यांनी केले असुन या क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8055512888,7972183619 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन संकल्प क्लासेसच्या व्यवस्थापनाने केले आहे.

नवगण राजुरीच्या पालावर पोस्टाची किराणा किट पोचली ; 150 कुटुंबांना मदत

बीड (प्रतिनिधी) :- 30 बीड पासुन जवळच असलेल्या नवगण राजुरी या गावामध्ये काही हातावर पोट असणाऱ्या धनगर समाजाच्या नऊ कुटुंबाची पाले आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय डबे, चाळणी तयार करून तो विकणे आज पर्यंत त्यांच्याकडे कसली मदत पोहोचली  नव्हती परंतु बीड पोस्टल कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांची दखल घेत आज पालावर प्रत्यक्ष जाऊन किराणा किट वाटप केलं यामध्ये अत्यावश्यक साहित्य व साबणाचा समावेश होता. 
लाॅकाडाऊन मुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत यांचा फटका या पालात राहून डबे चाळण्या तयार करुन विकणाऱ्या फिरस्ती भटक्या लोकांना जास्त बसला आहे. एका गावात तीन ते चार महिने राहतात , राशन कार्ड नसतं, शासनस्तरावर कसली मदत नाही. गावात फिरून व्यवसाय करू दिला जात नाही  त्यामुळे उपजीविकेचे साधन त्यांच्याकडे नाही उपास मारीची वेळ आहे अशा गरजवंत गरजू  लोकांना शोधुन बीड पोस्टल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरा पासून किराणा किट साहित्य वाटपाचे काम चालू आहे व त्यामध्ये खरेच गरजेचे आहेत अशांना शोधून या किराणा किट वाटल्या जात आहेत.
 नवगण राजुरी या गावालगत ऐकुन नऊ कुटुंब असलेल्या पालावर आज किराना किट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी पोस्टल कर्मचारी अमरसिंह ढाका,सुरेंद्र जावळे, इमरान तांबोळी, युवा नेते गौतम कांबळे, नितीन गायकवाड संकेत गायकवाड, गावडे आदी उपस्थित होते.

कापडशिंगि येथील विद्यूत रोहित्र जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित वीजपुरवठा सुरळीत करा ग्रामस्थांचि मागणी
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भ सीमेवर  येथील दुर्गम भागात असेलेले कापडशिंगि येथील गेल्या चार दिवसांपासून येथील गावठाण चे विद्यूत रोहित्र जळाले आहें सध्या पूर्ण देशात लॉक डाऊन असल्याने सर्व ग्रामस्थ गावातच आहेत पण रोहित्र जळल्याने गावातील ग्रामस्थां उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहें तसेंच या गावातील पाणी पुरवठा करणारी नळ योजना देखील बंद जाली आहें जळालेलें  विद्यूत रोहित्र काढून नेले आहें मात्र अद्याप हि नवीन रोहित्र आले नाही त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कापडशिंगि येथील लवकरात लवकर रोहित्र द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहें


तेजः न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

Wednesday, 29 April 2020

आडातच नाही मग पोहर्‍यात कुठुन येणार?


उज्वला गॅस कनेक्शन धारकांना करावा लागत आहे अडचणींचा सामना

प्रशासनाने लक्ष देन्याची गरज
         
मंगरुळपीर-सध्याच्या लाॅकडाउनमध्ये ऊज्वला गॅसधारकांची "आडातच नाही मग पोहर्‍यात कुठुन येणार? ही परिस्थीती झाल्याने प्रशासनाने लक्ष देन्याची गरज निर्माण झाली असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
             सध्या सुरु असलेल्या  संचारबंदीच्या काळात उज्वला गॅस कनेक्शन धारकांना मोफत गॅस उपलब्ध होणार असल्याची मोदी सरकारने घोषणा केली.यात माहे एप्रिल,मे व जून या तीन महिन्यांमध्ये ज्या गॅस धारकांकडे उजवला गॅस कनेक्शन आहेत,अशांनाच याचा लाभ दिला जाणार आहे.याचा फायदा बऱ्याच कुटुंबांना होणार आहे.मात्र बऱ्याच गॅस धारकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.
 याचे मुख्य कारण की,गॅस ग्राहकांना सुरुवातीला स्वतःकडून गॅसचे पैसे भरावे लागणार आहेत. तसेच गॅस बुकिंग करून गॅसची उचल केल्यानंतर पुढील महिन्यात रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने,सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागात असे कित्तेक गोर-गरीब आहेत,की त्यांना पोटाची खडगी भरन्याकरिता जीवाचे- रान करावे लागते.कित्तेक ग्राहकांकडे गॅस सिलेंडर भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.त्यातच गॅसची भाववाढ असल्याने अनेकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहे.मोफत गॅस वितरीत करतांना नियोजनाचा अभाव दिसून येतोय,जसे- गॅस ग्राहकांना पैसे बँकेच्या खात्यावर न जमा करता,ज्या गॅस धारक ग्राहकाने बुकिंग केली त्याच्या बुकिंगवरून संबंधित गॅस एजन्सीला सरकारने पैसे दिले असते,तर गॅस धारकांना या अडचणींना सामोरे जावे लागले नसते व बँकेच्या चकरा सुद्धा माराव्या लागल्या नसत्या.कित्तेक ग्राहकांचे मोबाईलवर मॅसेज सुद्धा येत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यावर यापूर्वीच शासनाने उपाययोजना केली असती,तर अशा अडचणींना सामोरे जावे लागले नसते.प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देवुन योग्य ऊपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.

गेवराई तालुक्यातील कर्तव्यदक्ष.. मुख्याध्यापक श्री. सोपानराव राठोड सर


सुभाष मुळे..
----------------
गेवराई तालुक्यातील सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे, तालुक्यातील सुशिक्षितांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिक्षणाची ज्ञानगंगा तालुक्यातील ग्रामिण भागातील सर्वसामांन्यांच्या दारात नेणारे अधुनिक भगीरथ, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील माजी मंत्री आदरनिय श्री. शिवाजीराव पंडित उर्फ दादासाहेब यांनी जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन अनेक शाळा, महाविद्यालय, अॅग्री, डिफार्मसी, वरिष्ठ महाविद्यालय, डि.एड., बी. एड. काँलेजची स्थापना केली.
यातीलच एक म्हणजे माध्यमिक विद्यालय, धोंडराई हे एक विद्यालय. या शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोपानराव राठोड सर हे ३० एप्रील रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 
           गेवराई तालुक्यातील केकतपांगरी जवळील हरलाल नाईक तांडा मातृभुमी असणारे सोपान सुखलाल राठोड सरांनी मंडळाच्या अनेक विद्यालयात कार्य केले. प्रथम जयभवानी हायस्कुल, शिवाजीनगर व माध्यमिक विद्यालय, दैठण येथे इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणुन कार्य केले. नंतर गेल्या वीस वर्षापासुन संस्थेत ते मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत होते. त्यात भेंडटाकळी, धोंडराई, गेवराई, भाटसांगवी, ऊमापुर,  बीड, व परत धोंडराई या ठिकाणी त्यांनी सेवा केली. सर्वाधीक मुख्याध्यापक म्हणुन  कालावधी धोंडराई येथे व्यतीत झाला. जवळपास दहा वर्ष त्यांनी या विद्यालयात सेवा केली. त्यामुळे आम्हालाही या कालावधीत त्यांच्या सोबत काम करण्याचा योग आला. खरच व्यक्ति तीतक्या प्रकृती असतात. राठोड सरासोबत काम करताना मला ते मुख्याध्यापका पेक्षा अध्यापकच जास्त दिसले म्हणुनच लेखाचे शिर्षकात मुख्य अध्यापक असे लिहले आहे. सातत्याने वर्गात जाने अध्यापन करने विद्यार्थांना इंग्रजीचे व्याकरण व विषय अध्यापन करणे. अगदी एप्रील मध्ये आम्ही शाळेत स्कुल फाँर्म होम उपक्रम सुरु केल्यावर ते सर्व वर्गाच्या ग्रुप मध्ये सहभागी झाले व विद्यार्थ्यांना इंग्रजीचा अभ्यास दिला, विद्यार्थांनी टाकलेला अभ्यास पाहुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या म्हणुनच म्हणतो मला ते अध्यापक म्हणुन जास्त दिसले. आपल्या कृतीतुन शिक्षकांनाही गतीशील करण्याची कला त्यांना अवगत होती. ते एकांतात बोलताना म्हणायचे की खरच माझा पिंड शिक्षकाचा आहे. पण तरी सुध्दा मुख्याध्यापक म्हणुन काम करत असताना कोणताही संस्थेचा किंवा शासनाचा काही मेसेज आला की ते काम कधी पूर्ण करु असे त्यांना व्हायचे अनेक वेळा आम्ही रात्री अपरात्री शाळेत जाऊन काम पूर्ण करायचो. शाळेत काम करत असताना आम्ही कधी कधी त्यांना म्हणयचो सर तकतक करुनका आपण करु ते काम.. शांत रहा असे ते म्हणायचे, पण त्यांची तगमग आम्हाला जाणवायची. सर्व सामान्यांची मुले आपले दैवत आहे हे लक्षात ठेवुन त्यांना ड्रेस, दप्तर, वह्या, पुस्तक वाटप करुन आपली बाधीलकी पूर्ण करत सहकाऱ्या सोबत काम करताना कधीही माझ्या हातुन कुणाचे नुकसान होनार नाही या पध्दतीने काम करण्यास प्रेरीत करत असत. आमच्यावर प्रचंड विश्वास त्यांचा होता. कोणताही पासवर्ड असो कि म्हत्वाचा कागद आम्हाला सहज ते आल्याबरोबर सेंड करत असत. संस्थेत काम करत असताना आदरनिय दादासाहेब व शिवछत्र परिवाराविषयी आपार श्रध्दा ठेवुन कार्यरत राहीले. आपन या परिवाराविषयी सतत ऋनी असले पाहीजे हा भाव मनी ठेवुन ते वागत व सर्वांना सांगत. मध्ये फेब्रुवारी मध्ये त्यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन झाले आणि तेव्हांच शिवजन्मोत्सव सप्ताह सुरु होता शाळेत चित्रकला स्पर्धा होती आम्ही अयोजन, नियोजन व्यस्थित केले तुम्ही शाळेत येऊ नका आम्ही सर्व बघतो म्हणुन सांगीतले तरी संस्थेची स्पर्धा आहे म्हणुन स्वतःचे दु:ख विसरुन ते स्पर्धा पूर्ण होई पर्यंत शाळेत थांबले. कौटोंबीक पार्श्वभुमीचा विचार करता पत्नि, दोन मुले प्रदिप व संदिप मोठा प्रदिप हा प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहे सुनबाई इंजीनियर, संदिप स्पर्धा परिक्षा देऊन लवकरच यशस्वी होईल. 
     अशा प्रकारचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. राठोड सर तीस एप्रील गुरुवार रोजी आपली प्रदिर्घ सेवा पूर्ण करुन निवृत होत आहेत. देशावर व जगावर कोरोनाचे संकट ओढवल्या मुळे मोठ्या स्वरुपात सेवापूर्ती सोहळ्याचे अयोजन आपन सध्या करु शकत नाहीत. पण शालेय पातळीवर १ मे रोजी शालेय समीतीचे अध्यक्ष श्री. भरतदादा खरात, चेअरमन श्री. नारायणराव नवले, श्री. भास्करराव खरात, श्री. मच्छींद्रनाना खरात व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत छोटेखानी सत्काराचे अयोजन आहे. यथावकाश संस्था पातळीवर सार्वत्रीक कार्यक्रमाचे अयोजन केले जाईल. आप्तेष्ट, स्नेहीजन व सहकारी बांधवानी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आपले शुभ संदेश द्यावेत. सेवापूर्तीनंतर त्यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो, त्यांच्या निरामय जीवनाची कामना संस्थेचे सचिव श्री. अमरसिंह पंडित, सहसचिव श्री. जयसिंह पंडित, श्री. विजयसिंह पंडित, स्विय्य सहाय्यक श्री. अमृत डावकर, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर, प्रा. गोगुले सर, श्री. प्रताप हातोटे यांनी व्यक्त केली आहे. शेवटी काय तर शेक्सपियरने म्हंटल्या प्रमाणे हे विश्व एक रंगमंच असुन आपण सर्व त्यावरील कळसुत्री बाहुल्या आहोत प्रत्येकाला विधात्याने दिलेली भुमिका पार पाडवयाची असते. तसेच श्री. राठोड सरांनी अतिशय यशस्वीपने आपल्या वाट्याला आलेल्या सर्व भुमिका पार पाडल्या सेवा निवृत्ती नंतर त्यांना दिर्घ आयुरारोग लाभो, निरामय जीवन व्यतीत करत असताना ईश्वर सेवा घडो हिच आजच्या मंगल दिनी आई भवानी कडे प्रार्थना.
श्री.उदय पाठक
शिक्षक, माध्यमिक विद्यालय, धोंडराई
ता. गेवराई जि. बीड
मो. 9422041907

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण


     बीड, (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले  आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
            शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  उपस्थित राहु नये.  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. शासनाच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्हयात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवु नये, असे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी कळविले आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा


जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट मोफत वाटप केले जाणार

ऊसतोडणी करून आलेल्या व होम क्वारंटाइन असलेल्या हजारो मजुरांना मिळणार लाभ

 बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर

बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून  जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.

ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने ना. मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशीत केले होते . 

त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ , उपाध्यक्ष बजरंग सोनवणे,  इतर सभापती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागील चार दिवसांपासून याबाबत सखोल अभ्यास व प्रयन्त करून शासनाची विशेष बाब म्हणून धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परवानगी मिळवली.

या निर्णयानुसार ऊसतोड मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १७ तारखेच्या शासन निर्णयानुसार अधिकृत नोंदणी करून परत आलेल्या ऊसतोड मजुरांची कुटुंब संख्या निश्चित करून, सदर चांगल्या प्रतीच्या किराणा मालाचा दर निश्चित करून त्या - त्या ग्रामपंचायतिला निधी वर्ग करण्यात येईल व ग्रामपंचायतीच्या मार्फत हे किराणा किट वाटप करण्यात येतील अशी माहिती जि. प. अध्यक्षा सौ शिवकन्या शिरसाट यांनी दिली.

दरम्यान राज्य ग्रामविकास विभागाने या निर्णयातील तांत्रिक बाबींना तात्काळ मान्यता दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व  विभागाचे आभार मानले आहेत. 

तसेच कोणत्याही गावामध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर चार गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना ना. मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना दिल्या आहेत.

आतापर्यंत नोंदणीकृत जिल्ह्यात आलेल्या तसेच अजूनही परत यायला सुरूच असलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना या निर्णयाचा फायदा होणार असून पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निहाय दर व कुटुंब संख्या निश्चित करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

धनंजय मुंडे - खरा पालक

करोनाच्या संकटामुळे सुरू झालेल्या लॉक डाऊन मध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजुरांची सुरुवातीला ज्या ठिकाणी हे मजूर ऊस तोडणी करत आहे त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून सोय केली . 

लॉक डाऊन चा दुसरा फेज सुरू  होताच त्यांना विशेष प्रयत्न करून जिल्ह्यात परत आणले आणि आता परत आल्यानंतर त्यांची जीवनावश्यक वस्तू अभावी हेळसांड होऊ नये म्हणून त्याची ही व्यवस्था करून खरे पालकत्व सिद्ध करून ऊसतोड मजुरांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेतले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने परळीतील डॉक्टर व पोलिसांना 400 फेस शिल्डचे लवकर वाटप-डॉ. संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटाता विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर व पोलिस समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे वतीने व धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून परळीतील डॉक्टर व पोलिस यांना 400  फेसशिल्ड वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष परळी मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले. 

           जगभरासह देशात व राज्यात एकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटात दोन हात करण्यासाठी परळीतील या कोवीड योध्दात एखाद्या योध्दासारखे योगदान देत आहेत.

 पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार.ना. अजित पवार  खा. सुप्रिया सुळे, ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात  दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे. परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून व त्यांच्या हातून या फेस शील्ड (मास्क) चे वाटप करण्यात येणार आहे. फेस शिल्ड मुळे डॉक्टर यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळणार आहे..

           'कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे. खा. शरद पवार साहेबांच्या सुचनेवरून राज्यभरातील डॉक्टर कृतज्ञतापूर्वक 1,25,000 फेस शिल्ड चे वितरण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्य़ातीही सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून दिड हजार डॉक्टर प्रत्येकी दोन या प्रमाणे 3000 फेस शिल्ड देण्यात येणार आहेत. तसेच परळीतील  डॉक्टर व पोलिस यांना 400 फेस शिल्ड लवकर वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठान यांच्या मदतीने पुण्यात मोफत जेवण ; हॉटेल मराठवाडा नारायण पेठ पुणे अनिलकुमार गित्ते दररोज सकाळी नाश्ता व दोन वेळेचे जेवण अशी 500 पार्सल महिन्यभरापासून वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन जाहीर करण्यात आले.प्रथम महाराष्ट्र सरकारने व नंतर केंद्र सरकारने लाँकडाऊन वेगवेगळ्या वेळी जाहीर केले. या गोंधळामुळे स्पर्धा परिक्षा करणारे विदर्भ व मराठवाड्यातील मिळून २ हजारांच्या आसपास विद्यार्थी पुण्यात अडकलेले आहेत.
मराठवाडा हाँटेल नारायण पेठ येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठापन यांच्या मदतीने 25 मार्च पासून हॉटेल मराठवाडा नारायण पेठ पुणे अनिलकुमार गित्ते रोज सकाळी नाश्ता व दोन वेळेचे जेवण अशी 500 पार्सल वाटप करत आहेत.स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी हे मागील ३० दिवसापासून येथे जेवण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आज मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. परंतु रोज पुण्यात वाढणारा कोरोना रूग्णांचा आकडा पाहून भीती वाटत असल्याचं सर्व विद्यार्थ्यी मत व्यक्त करत आहेत. यामुळे हाँटेल चालक ही चिंतेत जीवन जगत आहेत. मुलांना जेवण वाटप केले जात असताना जर संसर्ग झाला तर सर्वांना क्वराँन्टाईन करावे लागेल. या भीतीने सर्व जण जेवण वाटप करत आहेत. सरकारनं सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर कोरोना तपासणी करून त्यांना त्यांच्या गावी सुरक्षित पणे पाठवावे अशी अपेक्षा अनिलकुमार गित्ते यांनी यावेळी व्यक्त केली.

परळीत लाँकडाऊनमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ; शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी- श्रीहरी गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
          संपूर्ण देशात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पहिल्या १४ दिवसांच्या लाँकडाऊन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लाँकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे सर्व खरेदी, विक्री चे व्यवहार, व्यवसाय बंद पडल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शासनाने मदत करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
                      कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तालुक्यात सर्वात जास्त दुध विक्री करणारे गाव म्हणून चांदापुर या गावाची ओळख आहे. हे गाव साधारणपणे ८०० लोकवस्तीचे आहे. या गावातील प्रत्येक घरात दुभती म्हैस आहे.ती पण कमीत कमी एका घरात किमान तीन ते चार मोठा शेतकरी असेल तर ६० पर्यंत दुभत्या म्हैस आहेत. एका घरातून ५० लिटर दुध विक्री केले जाते. ज्यांच्याकडे जास्त म्हैस आहेत त्यांचे १०० लिटर पर्यंत दुध विक्री केले जाते. लाँकडाऊन च्या अगोदर शहरातील रहिवाशांना घरोघर व हाँटेलवर दुधाचे वर्वे लावलेले होते. शहरातील रहिवाशांना ४० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दुधाला भाव मिळत असतो.तर हाँटेलवर ४० रुपये भाव मिळत असे. यामुळे दुधातून चांगली कमई होत होती. पण कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाल्यामुळे व हाँटेल व्यवसाय बंद असल्याने दुध शहरातील डेअरीला घालावे लागत आहे. डेअरीला दुधाला २० पासून २५ रुपयांपर्यंत लिटरला भाव मिळत आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यासंदर्भात गावचे सरपंच तथा दुध उत्पादक शेतकरी श्रीहरी गित्ते यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसने आमचे कंबरडे मोडले आहे कारण आमच्याकडे ६० मोठ्या म्हशी आहेत. जवळपास १०० लिटर दुध निघते. लाँकडाऊन अगोदर आमचे दुधातून चांगले उत्पादन होत असे. मात्र हाँटेल व्यवसाय बंद झाल्यामुळे दुध परळीतील डेअरीला घालावे लागत असून भाव २५ रुपयांपर्यंतच मिळत आहे. यामुळे आमचे जवळपास ५ हजार रुपयांचे रोजचे नुकसान होत आहे. आमचे संपूर्ण गाव तालुक्यात सर्वात जास्त दुध विक्री करते.यामुळे गावाचेही मोठे नुकसान होत आहे. जसे लाँकडाऊन सुरु झाले आहे. तसे आम्ही डेअरीला दुध घालत आहोत. परंतु आजपर्यंत घातलेल्या दुधाचे पैसे मिळाले नाहीत. ते लवकरात लवकर मिळावेत.गेल्या २१ दिवसांपासून एक रुपयाही आम्हाला खर्च करण्यासाठी मिळाला नाही. यावेळी गोपाळ गित्ते, परमेश्वर गित्ते, भागवत गायकवाड, लक्ष्मण काळे, अंबाजी बदने,महादेव गित्ते , सिध्देश्वर गित्ते या दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

परमेश्वर गित्ते यांनी सांगितले की, कोरोना महामारीचा दुध उत्पादकांना मोठा फटका बसला असून माझ्या कडे २५ म्हैस असून ५० लिटर दुध विक्री करतो.पण हाँटेल बंद झाल्याने दुध परळीतील डेअरीला घालत आहोत. तसेच लाँकडाऊन मुळे सरकी पेंडीचे भाव वाढले असून १ हजार ५० रुपयांना मिळणारे पेंडीचे पोते १ हजार दोनशे ५० रुपयांना खरेदी करावे लागते आहे. एका बाजूला दुधाचे भाव कमी आणि जनावरांच्या पेंडींचे २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी.

मयताच्या कुटुंबास चार लाखांची मदत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मांडेखेल येथील विजयमाला सुधाकर नागरगोजे यांचे पती वीज पडून मयत झाले. त्यांना शासनाकडून चार लाखांची मदत करण्यात आली आहे.
         विजयमाला नागरगोजे यांना मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केला. यातून लाखांची मदत करण्यात आली आहे. याचा धनादेश पालकमंत्री धनंजय मुंडे, तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी नगर परिषदचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट व इतर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे सामाजिक भान ; संपूर्ण पाथरा गावास वाटले मास्क


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
कोरोना साथरोगाच्या संकटकाळी आपली जबाबदारी ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम समाजात काही मोजके लोक,संस्था,संघटना,आस्थापना करीत आहेत.आपल्याकडे काही नसताना ही इतरांना मदत व सहकार्य करण्याचा दातृत्वपणाचा गुण फार कमी लोकांमध्ये पहावयास मिळतो.असेच लोकहिताचे काम सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळा करीत आहे.सामाजिक भान व बांधिलकी जोपासत या शाळेने संपूर्ण पाथरा गावास मास्क दिले असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मौजे पाथरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे यांच्या वतीने सध्या राज्यावर आणि देशावर कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवु नये व आपत्कालीन परिस्थितीवर कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आपल्याच गावातून चांगली सुरूवात व्हावी या अनुषंगाने तसेच शासनाला सहकार्य व्हावे या भावनेतून पाथरा गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घरपोहोच मास्कचे वाटप करण्यात आले.विशेष म्हणजे सन 1998 पासून ही आश्रम शाळा सुरू आहे.2006 साली या शाळेला कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली.तेव्हा पासून एक रूपयाचे अनुदान नसताना ही संस्था आणि कर्मचारी हे एकत्र आले.कोरोना आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.हे विशेष.डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेने सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीब आणि वंचित समुहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार शिक्षण देवून आपुलकीने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे.याचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.परंतु,यात जनतेचाही सहभाग असणे गरजेचे आहे.मास्क लावणे वेळोवेळी हात धुणे,सोशल डिस्टन्स पाळणे हे गरजेचे असताना अनेक ठिकाणी शासनाच्या आदेशाची पालन होत नाही.विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. याच विषयी चिंतन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे आणि कर्मचारी यांनी शासनाला सर्वतोपरी सहकार्याच्या भावनेतून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपले गाव कोरोना मुक्त आणि सुरक्षित राहावे या अनुषंगाने मौजे पाथरा येथील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्याचे ठरवले.त्यानुसार पाथरा गावच्या सरपंच अपर्णा प्रवीण पवार, उपसरपंच काशिनाथ पवार यांच्याकडे आश्रमशाळेच्या वतीने मास्क सुपूर्द करून उपस्थित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुरभी वाघमारे,संस्थाध्यक्ष लहू  बनसोडे,आश्रमशाळेचे सहशिक्षक,कर्मचारी यांनी गावातील नागरिकांना मास्क देऊन सुरक्षितता विषयी मार्गदर्शन केले.तर याविषयी सरपंच अपर्णा पवार यांनी सांगितले की, आश्रमशाळेने राबवलेला उपक्रम हा स्तुत्य असून ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा निर्जंतुकीकरण तसेच समुपदेशन करून वेळोवेळी नागरिकांना सूचना केलेल्या आहेत.
विशेष म्हणजे संपूर्ण भारतात एखाद्या खेडेगावात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मास्क देणारे आश्रमशाळेचे संचालक लहू बनसोडे हे आदर्श नागरिक असून भारतातील प्रत्येक खेड्यातील ग्रामपंचायतने किंवा एखाद्या संस्थेने पुढे येऊन मास्कचे वाटप करणे ही काळाची गरज वाटते.कारण,शासनाच्या आदेशानुसार अनिश्चित काळासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे.तरच अशा आपत्तीजनक परिस्थितीतून आपण स्वतःला आणि देशाला सावरू शकतो लहू बनसोडे यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केविड 19 ला मदतीसाठी अंबेझर पार्शवनाथ संस्थाच्या वतिने आर्थिक मदतपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या  सगळीकडे केविड 19 कोरोनासाठी विविध संघटना  राजकिय  नेते  सामाजिक संस्था  या सह ईतर संघटना मदतीसाठी पुढे  येत यातही आपला मोलाचा हातभार असावा या  दृष्टीकोनातून  श्री  अंबेझर पार्शवनाथ संस्था  च्या  वतिने कोरोना ग्रस्तांसाठी   केविड 19 सहाय्य मुखयमंञी  निधीस दोन हजाराचा  धनादेश  आज  अध्यक्ष  धनयकुमार  गोरे सचिव आशा कानहडे  यांच्या  हस्ते  नायब तहसीलदार रूपनर  यांचा कडे  देण्यात आला.

गेल्या  एक  महिन्यांपासून  जगभरात  व देशात केरोना या विषाणुने   कहर केला आहे या मुळे  आपला  देश  या कोरोनापासुन सुरक्षित राहावा या दृष्टीने  देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी लाॅकडाऊन करण्याचा  निर्णय घेतला  या मुळे  मोठ्या  प्रमाणात  आर्थिक  संकट ऊभे टाकले. 
या कोरोना चा महामारीत संकटना मदत करण्यासाठी  विविध संघटना राजकीय नेते मदतीसाठी सरसावले आहेत  आपणही या मोठया संकटात हातभार लाववा या साठी  संस्थेचे  सचिव अस्मिता  गोरे  यांनी   हा निर्णय  तातडीने घेतला  असुन  दोन  हजाराचा धनादेश  नायब 
 तहसीलदार   रूपनर  यांचाकडे  देण्यात  आला  
  या वेळी  संस्थेचे   अधयक्ष धनंजय गोरे   सचिव  अस्मिता गोरे   झुंजार नेता चे प्रतिनिधी अनंत कुलकर्णी  सचिन गोरे  मनोज गोरे  सुनिल महाजन  आकाश सर सिदधकुमार  मामा   आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लावण्याई पब्लिक स्कूल तर्फे ५ हजाराचा धनादेश ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळेचा पुढाकारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाय योजना होत आहे. अशा परिस्थितीत शासनाला आपणही सहकार्य करावे आणी या संसर्गजन्य रोगावर  मात देण्यासाठी सहाय्य करावे या हेतुने  लावण्याई पब्लिक स्कूलच्या वतीने येथील तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांन जवळ  ५ हजाराचा धनादेश देण्यात आला आहे. 

 लावण्याई पब्लिक स्कूल नेहमीच    सामाजिक बांधिलकी जपत शहरात अनेक उपक्रमात सहभाग घेते.
  शाळेचे  अध्यक्ष  चनबसअप्पा गिरवलकर,  कार्याध्यक्ष मधुकर गिरवलकर,  सचिव निता गिरवलकर यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या प्राचार्या अस्मिता गोरे, वैजनाथ गिरवलकर, पत्रकार  अनंत कुलकर्णी  धनंजय गोरे  यांनी आज   नायब  तहसीलदार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ हजार रुपयांचा  धनादेश सुपुर्द केला आहे.
   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोवीड १९ करीता मदतीचे आवाहन केले होते.  शहरातील लावण्या पब्लिक स्कूलने यासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य केले. लावण्या पब्लिक स्कूल नेहमीच सामाजिक कार्यासाठी अग्रेसर आहे. या उपक्रमामुळे  शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लॉकडाऊन व रमजान महिन्यात भारनियमन बंद करण्याची राष्टÑवादीची मागणी


परभणी : प्रतिनिधी 
देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे तसेच सध्या रमजान महिना सुरु झाला असून या काळात महावितरणच्या वतीने भारनियमन बंद करण्याची मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे राष्टÑीय महासचिव जलील पटेल यांनी उर्जामंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
उन्हाळा सुरु झाला असून उन्हाचे चटके बसू लागले .  सध्या रमजान महिना सुरु असून लॉकडाऊनमुळे मशीदी बंद असल्यामुळे नागरिक आपल्या घरातच प्रार्थना करत आहेत.केवळ मुस्लीम नव्हे तर देशाचे नागरिक लॉकडाऊनमुळे घरातच आहेत.अशा वेळी शहरी व ग्रामीण भागातील भारनियमन पुर्णत: बंद होणे गरेजेचे आहे. परंतू आजवर भारनियमन काही कमी करण्यात आलेले ंनाही.महावितऱणकडे वीज उपलब्ध असून २४ तास सुध्दा वीज पुरवठा करू शकतात परंतू महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिल्हयातील ग्रामीण भागात भारनियमन आजही सुरुच आहे. ते तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सचिव जलील पटेल यांनी उर्जामंत्र्याकडे केली आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यात आडकले मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी ; राज्य सरकारने गावाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी-भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-
कोरोना हे महामारीचे संकट सुरू झाल्यापासून जवळपास दोन महिने होत आले आहेत.मराठवाड्यातील मुलं-मुली शिक्षण आणि नोकऱ्यांच्या माध्यमातून मुंबई,पुणे,औरंगाबाद, बेंगलोर,नाशिक आदी मोठ्या शहरात अडकून पडले आहेत.कोटा येथे आडकलेली मुलं गावाकडे पोहचविण्यासाठी ज्याप्रमाणे राज्य सरकारने पाऊले उचलली.त्याचप्रमाणे राज्याच्या विविध जिल्ह्यात आडकलेल्या मुलांना त्यांच्या गावी व घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने व्यवस्था करावी. त्यांना आई-वडीलांजवळ आणून सोडावे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.


निवेदनात भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमधून विशेषता लातूर,बीड,नांदेड,परभणी उस्मानाबाद,हिंगोली आणि औरंगाबाद आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर पुणे,मुंबई, नाशिक,सांगली,सातारा व कोल्हापूर या ठिकाणी मुले आणि मुली शिक्षणासाठी गेलेले आहेत.मार्च महिना हा परीक्षेचा असतो.त्यामुळे बहुतेक मुलं आणि मुली हे ज्या ठिकाणी शिकत होते. त्याच ठिकाणी अडकलेले आहेत.पुणे व मुंबईसारख्या शहरात हजारोंच्या संख्येने  मुले आणि मुली अडकलेली आहेत.नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालेले.पण,कंपनीत नौकरीला लागलेले असेही असंख्य लोक आज या लॉकडाऊन मुळे अडकून पडले आहेत.22 मार्च पासून लॉकडाऊन देशात सुरू झालं आणि आणि आजतागायत त्या मुला-मुलींना गावाकडे येता आलेले नाही,घरात बसून कोरोना या संकटांची चिंता, आणि बाहेर आपली मुलं आणि मुली कशी असतील यांची चिंता वाटते.अशी अवस्था प्रत्येकाच्या घराघरात आहे.एवढेच नाही तर अनेक मुला-मुलींची उपासमार होत आहे.त्यांचेकडे
खाण्यापिण्यासाठी किराणा साहित्य पण नाही.तर पुणे मुंबई सारख्या शहरात खाणावळी (मेस) बंद आहेत.शासनाने ज्याप्रमाणे राजस्थान मधून कोटा येथील मुला-मुलींना घेऊन येण्यासाठी सोय केली.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात जिल्हा अंतर्गत बाहेरगावी अडकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी आई-वडिलांच्या जवळ आणून सोडण्यासाठी शासनाने वाहनांची सोय व व्यवस्था करावी.तसेच एस.टी.महामंडळामार्फत उपलब्ध करून त्यांना आपल्या गावाकडे घरी पोहोचविण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.  वास्तविक पाहता आई-वडीलांसमोर कोरोना या जीवघेण्या रोगापेक्षा या मुलांच्या खाण्यापिण्याची चिंता आहे.एवढेच नव्हे तर नोकरीला लागलेले किंवा छोट्या-मोठ्या कंपनीत काम करणारे सुशिक्षित युवकवर्ग हा मोठ्या प्रमाणावर अडकलेला आहे. त्या मुलांना जिल्हा अंतर्गत प्रशासनाशी संपर्क साधून प्रसंगी त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करून आपल्या घरी जर पोहोचले तर अशा या संकटात आई-वडिलांची चिंता संपल्याशिवाय राहणार नाही.त्यांना परत पोहचविण्याची जबाबदारी सरकारची आहे.सरकारने याबाबत तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी ही राम कुलकर्णी यांनी केली आहे.

खरीप हंगाम 2020-21 नियोजन बैठक


खरीप पतपुरवठा सुरळीत ठेवा
कर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास बँकांविरूद्ध एफआयआर:-                           - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

             खरीप पीक हंगामासाठी शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. कर्ज मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जपुरवठ्यात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
            जिल्हा खरीप हंगाम 2020-21 नियोजन बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा,आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे आदी यावेळी उपस्थित होते. 
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवाला खरीप हंगामात पतपुरवठा वेळेत झाला पाहिजे. बँकांनी त्यांची अडवणूक करू नये. यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समित्यांनी प्रभावीपणे देखरेख, पाठपुरावा करावा. बियाणे, युरिया खते पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. त्याची कृत्रिम टंचाई होता कामा नये. कृत्रिम टंचाई किंवा ब्लॅक मार्केटिंगचा एकही प्रकार आढळता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले.
            महावितरण विभागाकडून अनुपालनात दिरंगाई असल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.त्या म्हणाल्या की, वीजपुरवठा, नवीन वीज जोडणी ही कामे गतीने झाले पाहिजेत. अनेक ठिकाणी नियोजित कामे पूर्ण न झाल्याने निधी अखर्चित राहिल्याचे दिसते. डीपी बसविण्याच्या कामात दिरंगाई व अपप्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे गंभीर आहे. याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांची कामेही तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
 काही भागात एका कंपनीचे बियाणे निकृष्ट असल्याने पीकाचे नुकसान झाल्याची तक्रार आहे. त्याबाबत कंपनीची जबाबदारी, तसेच तेथील शेतक-यांना द्यावयाच्या नुकसानभरपाईबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा अधिका-यांकडून वेळोवेळी पाठपुरावा झाला पाहिजे. अधिका-यांनी पाठपुरावा केला नाही आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी माहिती दिली नाही तर कामाची गती मंदावते. त्यामुळे सजग राहून कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
            कृषी विभागाचे नियोजन, निविष्ठा उपलब्धता, योजना, उपक्रम, पीक मार्गदर्शन याची स्थानिक संदर्भांसह माहिती शेतकरी बांधवांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचली पाहिजे. तालुका कृषी अधिका-यांकडूनही यासाठी गावोगाव माहिती, मार्गदर्शन साहित्य पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले. 
लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून नियोजन करा.   तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना कृषी नियोजन, योजना, उपक्रम यांची माहिती वेळोवेळी देऊन त्यांच्या सूचना जाणून नियोजन केले पाहिजे. पोकराची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. त्याची गती वाढवावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
           ड्राय झोनमध्ये फळपीक घेण्यावर मर्यादा असते. त्यामुळे कमी पाण्यात येणा-या फळपीकांची लागवड अशा ठिकाणी करून तिथे फळपीक योजना राबविता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावा, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.
       कापूस खरेदीसाठी शेतक-यांची नोंदणी करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर कापूस घेऊन येणा-या रोज 40 पर्यंत गाड्यांना सध्या परवानगी दिली आहे. मात्र, हळूहळू ही संख्याही वाढवून खरेदीला गती देऊ. एकदम गर्दी होऊ नये हा त्याचा हेतू असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले. कृषी विभागाच्या विविध माहितीपत्रकांचे प्रकाशनही यावेळी झाले.
                खरीप नियोजन   जिल्ह्यात 12.21 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, लागवडीलायक क्षेत्र 7.81 लाख हेक्टर आहे. सरासरी खरीप क्षेत्र 7.28 लाख हेक्टर आहे. लागवडीलायक क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी 93 टक्के आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद ही प्रमुख पीके आहेत.
        जिल्ह्यात लागवडीलायक जमीनीच्या 7. 81 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 1.60 लाख हेक्टर इतके क्षेत्र खारपाणपट्ट्यात मोडते. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 13 टक्के इतके त्याचे प्रमाण आहे. या क्षेत्रात 355 गावांचा समावेश आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 7.28 लाख हेक्टर असून, सरासरी क्षेत्राच्या 100 टक्के क्षेत्रावर प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे.
        कापूस या पीकाचे प्रस्तावित क्षेत्र 2 लाख 61 हजार हेक्टर, सोयाबीनचे 2 लाख 68 हजार हेक्टर व तुरीचे 1 लाख 10 हजार हेक्टर, तर मूग व ज्वारीचे प्रत्येकी 30 हजार हेक्टर प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे, उडदाचे 10 हजार हेक्टर, मक्याचे 9 हजार 500 व इतर पिकांचे 9 हजार 612 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.
        जिल्ह्यात यापूर्वी मेळघाटात कोदो, कुटकी या भरडधान्य पिकांची प्रात्यक्षिके, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यात ओवा पिकांची प्रात्यक्षिके, तसेच, विस्तार, आत्मा, पोकरांतर्गत 1 हजार 304 शेतीशाळा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. अशा उपक्रमांत सातत्य ठेवावे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
जमील पठाण
8805381333 /8804935111

मराठवाडा शिक्षक संघाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक्कावन हजार रूपये मदत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिनांक 29 एप्रिल:- मराठवाडा शिक्षक संघाने कोरोना महामारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवीत असलेल्या विविध उपाययोजनांसाठी ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाआहे. मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, संघटनेचे जेष्ठ नेते एस.जी.स्वामी, बंडू आघाव, के.आर.कसबे आणि महादेव धायगुडे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीच्या वतीने परळीचे तहसीलदार डाॅ. विपिन पाटील यांचेकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
या बाबत अधिक माहिती अशी की कोरोना महामारी हे अखिल मानवजातीवर आलेले संकट आहे. संपूर्ण जग या विषाणूच्या विळख्यात सापडलेले आहे. महाराष्ट्रातही हा विषाणू हातपाय पसरतो आहे. राज्यातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी
, पोलीस या संकटाचा धैर्याने मुकाबला करत आहेत. गोरगरिबांना मदतीचा हात दिला जात आहे. शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ लढा देत असलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीने आपले सामाजिक ऊत्तरदायित्व निभावण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत देण्याचा निर्णय घेतला आणि त्या नुसार मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे यांनी पदाधिका-यांसह जावून आज बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी परळी तहसीलदार डाॅ. विपिन पाटील यांचेकडे ५१ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

परळीत अखिल किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना शेतकऱ्यांचा विविध मागण्याचे निवेदन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी तालुक्यात सध्या लोक डाउन असल्यामुळे शेतकरी गोरगरीब बेरोजगार अडचणीत सापडले आहे म्हणून परळी तालुका किसान काँग्रेसच्यावतीने तहसीलदार नितीन पाटील यांना विविध विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले खरिप पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे खते औषधी व अन्य सामग्री मोफत उपलब्ध करून देण्यात यावी मनरेगाची कामे चालू करण्यात यावी स्वस्त धान्य दुकान व मार्फत सर्वांनाच रेशन पुरवठा करण्यात यावा द्या रेशन दुकानदारांनी नियमाप्रमाणे धान्य वाटप केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी बेरोजगार युवकांना नरेगा मार्फत जॉबकार्ड देण्यात यावी शहरी भागातील युवकांनाही जॉब कार्ड देण्यात यावे पीक कर्जाचे पुनर्गठन  करून त्वरित नवीन कर्ज वाटप करावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार परळी वैजनाथ यांना किसान काँग्रेसचे परळी तालुका अध्यक्ष लहू दासतांदळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एडवोकेट अनिल मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार व तालुका कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ गणपत कोरे प्रकाश देशमुख विजय अवस्थी यांनी दिले.