तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

अखंड हरिनाम सप्ताह रद्द करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले 1 लाख 1 हजार रुपये,चोरवाघलगाव ग्रामस्थांचा आगळा वेगळा उपक्रम.


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे दरवर्षी होणारा अखंड हरिनाम सप्ताह रद्द करून सर्व गावकऱ्यांच्या वतीने गोरगरिबांना धान्य वाटप करून 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स पाळत वैजापूरचे तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील,गटविकास अधिकारी अजय पवार,वैजापूर चे तलाठी जितेंद्र चापानेरकर,ग्रामसेवक कचरे,तलाठी दिलवाले, मधुकर महाराज,सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a comment