तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी कै. संतोष दहिफळे यांच्या स्मरणार्थ 11001 रुपयांची पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत पंतप्रधान सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी-दहिफळे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरत चालला असल्यामुळे या रोगाची धास्ती सर्वच क्षेत्रात घेण्यात येत आहे.  कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी कै. संतोष उर्फ (राजु )ज्ञानोबा दहिफळे यांच्या समरणार्थ रु. 11001/- रूपयांची पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत जमा केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करून कोरोनाच्या संकटकाळीतील निवारण्यासाठी मदत होईल असे आवाहन दहिफळे परिवारांनी केले आहे.
            जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करिता मोठा निधी जाहीर केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला 'पीएम केअर फंड' साठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत 11001 रूपयांची पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये आर्थिक मदत जमा करण्यात आली. ही रक्कम बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील हाळम येथील कै. संतोष उर्फ (राजु ) ज्ञानोबा दहिफळे यांच्या स्मरणार्थ दहिफळे परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत हा निधी पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये जमा केला आहे.
          सध्या जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे.या कोरोनामुळे प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींना मदत करणे गरजेचे बनले आहे. या साठी पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कै.संतोष दहिफळे यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान निधीत आर्थिक संकटात सहकार्य करण्याच्या उद्देशाने हि मदत करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक डी.एन.दहिफळे यांनी दिली. दहिफळे कुटुंब नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात मदतम्हणून हातभार लावत असतात तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
            कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्यासाठीआहे. आज संपूर्ण देश एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहे.आपणही या लढ्यात खारीचा वाटा उचलून योगदान देऊ शकतो. पंतप्रधान सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी, कोरोनाच्या संकटात नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेला सुचना व आदेशाचे पालन करा. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनास सहकार्य करा, घरीच रहा, सुरक्षीत रहा, इतरांचीही काळजी घ्या असे आवाहन हेळंब, हाळमचे ग्रामसेवक डी.एन.दहिफळे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment