तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

क्रांतीसूर्याच्या जयंतीदिनी जागवला सामाजिक वसा पत्रकार वैभव स्वामी आणि शिवा संघटनेचे सचिन शहागडकर यांनी 111 गरजवंतांना घरपोहोच वाटप केली जीवनावश्यक किटबीड (प्रतिनीधी) :- आज कोरोनाचे भयंकर संकट जगभरात निर्माण झाले आहे.लॉक डाऊन  परिस्थितीमुळे लोक घरांमध्ये असल्या कारणाने हाताला काम राहिले नाही. यामुळे हातावर पोट असणारे सर्वसामान्य नागरिक, निराधार,वृद्ध,दिव्यांग,विधवा, बेरोजगार,शेतकरी,मजूर, मध्यमवर्गीय लोक हवालदिल झाले आहेत.स्वाभिमानी असणारी ही कष्टकरी जनता आता परिस्थितीने हतबल झाली आहे.या स्वाभिमानी कष्टकरी जनतेला अडचणीच्या काळात सन्मानाने आधार देण्यासाठी केज विधानसभा मतदार संघाचे वंचितचे उमेदवार पत्रकार वैभव स्वामी आणि शिवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तासह क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचे औचित्य साधून पहाटे सहा वाजता पेड बीड भागातील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बसवण्णा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वीरशैव लिंगायत समाजासह कष्टकरी आणि उपेक्षित असलेल्या कुटुंबीयांना घरपोच जीवनावश्यक साहित्य वाटप करून मोठा आधार दिला आहे.

रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी अक्षयतृतीया आणि क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर व जगद्गुरु एकोरामाराध्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून केज विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी यांचे नातू तथा केज विधानसभा निवडणुकी मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पत्रकार वैभव स्वामी आणि शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून गरजूवंतास मदत करण्याचे ठरवले.ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी  केज मतदार संघाचे पहिले आमदार,निष्कलंक व्यक्तिमत्व  तथा थोर समाजसेवक रामलिंग स्वामींच्या विचारांचा वारसा आणि आदर्श शिक्षक विवेक स्वामी व आई जगदेवी स्वामी यांचा आदर्श समोर ठेवून पत्रकार वैभव स्वामी यांनी तर शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या संकल्पनेनुसार शिवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची सामाजिक साथ सोबतीला घेऊन वीरशैव लिंगायत समाजातील कष्टकरी आणि गरजवंतांसह निराधार,अपंग, वयोवृद्ध,विधवा,कामगार, प्रेसलाईन कर्मचारी,वीटभट्टी वरील कामगार,सफाई कामगार धुणे भांडी व स्वयंपाक करणाऱ्या अशा विविध घटकामधील 111 गरजवंताना गहू,तांदूळ, हळद,साखर,तिखट,मुगदाळ, तेल,चहापत्ती,अंगाची साबण, कपड्याचे साबण,मीठ या किराणासह कांदे- बटाटे माळव्याची जीवनावश्यक किट बनवून स्वतः घरपोहोच सन्मानपूर्वक दिली. बीड शहरातील खारी विहीर,बलभीम नगर,एमआयडीसी,बुरुड गल्ली, नाळवंडी नाका,हनुमान नगर,सिद्धेश्वर नगर,जिजामाता चौक,नागोबा गल्ली,स्वराज नगर परिसरातील 111 गरजवंताना जीवनावश्यक साहित्य देत सामाजिक दायित्व पार पाडले. क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर सकाळ सकाळी अचानक न सांगता सन्मानाने मिळालेल्या या मदतीमुळे गरजवंत सुखावले.तर कुठेही गाजावाजा न करता राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व समाजातून या दोन युवकांचे अभिनंदन होत आहे.


घरोघरी साजरी झाली महात्मा बसवेश्वर यांची जयंती
कोरोना महामारीमुळे शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे बसव जयंती निमित्त साजरा होणारा पंधरवडा उत्सव रद्द करून क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वरांची जयंती प्रत्येक अनुयायांनी आपल्या घरी बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करावी असे आव्हान केले होते.या आव्हानाला प्रतिसाद देत शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी,वीरशैव समाजाचे अध्यक्ष रामेश्वर आप्पा कानडे यांच्यासह तमाम बसवन्ना यांच्या अनुयायांनी स्वतःच्या घरी प्रतिमेचे पूजन करून महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली.आपल्या घरी आपल्या परिवारासमवेत क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर व जगद्गुरु एकोरामाराध्य यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण अर्पण करून परमरहस्य गुरु ग्रंथाचे पठन करीत जयंती हर्षउल्हासात साजरी करण्यात आली.

No comments:

Post a Comment