तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

पंकजाताई व खा.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या पुढाकारातुन ; डॉ.राहुल घुले यांच्या "वनरुपी क्लिनिक मुंबई" यांच्या वतीने प्रभाग 13 मधील नागरिकांची केली थर्मल स्क्रिनिंग
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोना या भयंकर आजाराने थैमान घातलेले असतांना या पार्श्वभूमीवर मा पंकजाताई व खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या विनंती ला मान देत प्रसिद्ध डॉ राहुल घुले यांच्या  "वनरुपी क्लिनिक मुंबई" यांच्या टीम च्या  वतीने प्रभाग क्र 13 मधील 3970  एवढ्या नागरिकांची घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली.

कोरोना या आजाराचा लोकां मध्ये संसर्ग होऊ नये म्हणून पूर्ण भारत गेल्या 25 मार्च पासून लॉकडाऊन आहे , तरी कोरोना चा दररोज चा वाढता आकडा चिंताजनक आहे  सुदैवाने बीड जिल्ह्यात फक्त कोरोनाचा एक पेशंट सापडलेला आहे पण अनेक बाहेरगावी असणारे जिल्ह्यात परतत आहेत हीच चिंतेची बाब लक्षात घेता नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या विनंती ला मान देत मुंबई येथील प्रसिद्ध डॉ राहुल घुले हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या "वनरूपी क्लिनिक मुंबई" यांच्या टीम ने प्रभाग क्र 13 मधील जवळपास संपुर्ण भागातील 3970  एवढ्या नागरिकांचे घरोघरी जाऊन थर्मल तपासणी (स्क्रिनिंग) टेस्ट केली असून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्या बाबत सूचना सदरील टीम करत आहे.

  "वणरूपी क्लिनिक" हे मुंबई मध्ये जनसेवा या दृष्टिकोनातून मुंबईतील 27 ठिकाणी केवळ 1 रुपया फीस घेऊन आपले हॉस्पिटल्स चालवते या  टीम ने आतापर्यंत मुंबई मध्ये वरळी  13455 , लोअरपरेल 8000,कुर्ला वेस्ट येथे 10000, नागरिकांची घरोघरी जाऊन तसेच मुंबई येथील अनेक पोलीस पथकांपैकी 1310 पोलीस कर्मचारी वर्गाची  थर्मल स्क्रिनिंग केलेली आहे, अशा प्रकारे मुंबईत जवळपास 123000 पेक्षा ही जास्त लोकांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली व 200 हुन अधिक लोकांना सेल्फ होम कोरंटाईन राहण्याचा  सल्ला देण्यात आला, डॉ घुले यांच्या सामाजिक कार्याबद्दल कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपल्या ट्विटर वरुन कौतुक केलेले आहे.सदर उपक्रमात बाबत घरपोच थर्मल स्क्रिनिंग टेस्ट होत असल्याने व कोरोना आजाराबाबत मनातील शंका-कुशंका चे समाधान होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी मा पंकजाताई मुंडे, डॉ खा प्रितमताई मुंडे, प्रभाग 13 चे नगरसेवक प्रा पवन मुंडे व "वनरूपी क्लिनिक मुंबई" यांची टीम व डॉ राहुल घुले यांचे आभार मानले आहेत, या अभिनव उपक्रमात कार्यात वनरूपी क्लिनिक चे डॉ दीपक राठोड, डॉ संजय गवळी व प्रभाग 13 मधील युवक कार्यकर्ते महेश मुंडे , संदीप दराडे,सुरज सावजी,रामेश्वर संतनशे,माऊली संतनशे,आसाराम व्यास,शैलेश कापसे,सुरज गित्ते,आदिनाथ खाडे,दीपक शर्मा, प्रितेश तोतला, गणेश स्वामी,विनायक शंकूरवार, आकाश पिंपळे व त्यांचे त्या-त्या भागातील सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.चौकट : परळीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सातत्याने आपले कर्तव्य निभावणार्या प्रभाग क्र 13 मध्ये ड्युटीवर असणाऱ्या पोलीस बांधवांची सुद्धा या प्रसंगी थर्मल स्क्रिनिंग  करण्यात आली. या स्क्रिनिंग टेस्ट मुळे आमच्या प्रभागातील लोकांचे "कोरोना" या भयंकर आजाराबद्दल चे मनातील शंका-कुशंकाचे निरसन झाले असून, ताप, खोकला असणाऱ्या  लोकांना त्यांनी तज्ञ डॉक्टरांचा पुढील तपासणी बाबत सल्ला घ्यावा व स्वतः होम कोरंटाईन राहण्याच्या सूचना आम्ही देत आहोत.

---प्रा पवन मुंडे

No comments:

Post a comment