तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

पालम पोलीसांची धाडशी कामगिरी 14 लाख 87 हाजाराचा गुटख्याचा साठा जप्ततीन जणांविरूध्द गुन्हा दाखल


आरूणा शर्मा


पालम :- शहराजवळील पेठपिंपळगाव रस्त्यावरील मोकळ्या मैदानावर एका ऑटोमधून पालम पोलिसांनी गोवा गुटख्याचा खचाखच भरलेल्या बॅगा जप्त केल्या आहेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्यासह फोजदार विनोद साने व जगदीश काळे, आशोक केदारे, व्यकटी यवते, गवळी हे शनिवारी दि.18 च्या रात्री पेट्रोलिंग करीत आसताना पेठपिंपळगाव रस्त्यावर ऑटो (क्रमांक एम.एच. 26 बीई 56 45 ) संशयित स्पदरित्य आढळून आला त्यावेळी पोलिस पथकातील वाहनचालक प्रभाकर शिवाजी रूद्रघाटे यांच्या मदतीने पाहणी केली तेव्हा ऑटोत खचाखच भरलेल्या गुटख्या बॅगा दिसून आल्या तो माल लोहा येथील अनिल उत्तम कदम यांचा असल्याचा व ते स्वतः वाहनासोबत पालमला आल्याचे वाहनचालकाने म्हटले तो गुटख्याचा माल लक्ष्मण केरबा पवार (रा.शेखराजूर ता.पालम ) यांना देण्याकरिता आणला होता परंतू वाहन मालक व लक्ष्मण पवार हे दोघे पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले असल्याचे वाहनचांलकांनी म्हटले या पथकाने तातडीने तो गुटख्याचा माल पोलिस ठाण्यात आणला पाठोपाठ परभणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या माघ्यमातून पंचनामा केला तेव्हा अंदाजे 14 लाख 87 हजार 850 रूपायांचा गुटख्या आसल्याचे निदर्शनास आले दरम्यान प्रभाकर शिवाजी रूद्रघाटे, अनिल उत्तम कदम व लक्ष्मण केरबा पवार या तिघां विरूध्द  पालम पोलिसं ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a comment