तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

मंगरूळपीर येथे 175 कुटुंबांना धान्याचे वाटपलाॅकडाऊन काळात गरीबांना मदतीचा हात

वाशिम(फुलचंद भगत)-कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या सव्वीस दिवसांपासून  लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे अशा स्थितीत हाताला काम नसल्याने मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे ही बाब लक्षात घेऊन एक हात मदतीचा म्हणून मंगरूळपीर येथील युवा समाजसेवक सौरभ सपकाळ यांनी स्वखर्चातून आतापर्यंत जवळपास 175 मजूर कुटुंबांना धान्य वाटप केलेले आहे कोरोना संकटकाळात दानशूर व्यक्ती आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहे त्यात युवा नेते सौरभ सपकाळ व त्यांचा मित्र परिवार यांचाही समावेश आहे. त्यांनी मंगरूळपीर तालुक्यातील 175 कुटुंबांना पाच किलो गहू तीन किलो तांदूळ एक किलो साखर एक किलो तूर डाळ अर्धा किलो तेल अशा स्वरुपाची मदत केली आहे ही मदत वितरीत करतेवेळी मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे यांनी जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा घरीच रहा सुरक्षित रहा स्वच्छता राखा गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही असे आवाहन केले या उपक्रमात डॉ.प्रशांत वाघमारे, अजय गवारगुरु ,अरुण खडसे,युवराज किरडे ,अमित इंगोले ,अनुप कांबळे, ओम ढोबळे, प्रफुल भेंडेकर ,अक्षय इंगोले ,निलेश निचळ, संदीप इंगळे, राजूभाऊ मनवर व सर्व मित्र परिवार यांच्या हस्ते धान्य वितरित करण्यात आले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment