तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोव्हिड 19 प्रतिबंधक जनजागृती


 सोनपेठ : येथील कै रमेश वरपूडकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबवला. घरात बसून आपले मित्र, नातेवाईक व परिचयातील लोकांना घरात रहाण्याचा सल्ला सोशियल मिडियावरून सांगितले.
संपूर्ण जगात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे. भारतात या विशाणूच्या फैलावावर प्रतिबंध घालण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सोनपेठ शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनिता टेंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील 36 विद्यार्थ्यांनी  व्हाट्सअप द्वारे आपल्या मित्र आणि नातेवाईकांना "Stay home stay safety'  चा संदेश देऊन प्रत्येकाने घरात सुरक्षित राहू प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करून या उपक्रमा द्वारे सामाजिक बांधिलकी  जपली आहे

No comments:

Post a comment