तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

संकल्प मदत ग्रुपला गोटु विर यांची आर्थीक मदत तब्बल 20 दिवसापासून 300 कुटुंबियांना घरपोच जेवण बीड (प्रतिनिधी) :-  दि. 21
बीड येथील संकल्प मदत ग्रुप मागील 20   दिवसापासून उपाशी राहणाऱ्या गरजू कुटुंबियांना, पेशंटच्या नातेवाईकांना व निराधार लोकांना घरपोहच गरम जेवण देण्याचा निर्धार संकल्प  मदत ग्रुपने केला आहे. त्यानुसार दररोज रात्री 300 कुटुंबियांना गरम जेवण देण्याची अवघड प्रकिया संकल्प मदत ग्रुप पार पडत आहेत. या ग्रुपच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून  अभिनंदन होत आहे.
      कोरोना प्रतिबंधनात्मक लाॅकडाउन यानंतर हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांचे दुसऱ्या दिवसा पासूनच बेहाल सुरु झाले.सुरवातीचा आठवडा  कसाबसा गेला.पण नंतर खायचे काय असा प्रश्न अनेक घरामध्ये निर्माण झाला.उपाशी राहाण्याची वेळ अनेकांवर दुर्दैवाने आली.हि बाब लक्षात आल्यानंतर बीड येथील संकल्प मदत ग्रुपने स्वतः  जेवण तयार करून भुकेलेल्याना  जेवण देण्यास सुरवात केली.या संकल्प ग्रुपमध्ये जाधव व चौरे परिवार आणि सर्व मित्र परिवार  यांनी सामाजिक भान ठेऊन  मोठ्या मनानी संकल्प मदत ग्रुपला हातभार लावण्यास  सुरवात केली.अवघ्या  दोन  ते तीन  दिवसात सुमारे  50 ते 100 लोकांचे जेवण दररोज करून देण्यास सुरुवात झाली.संकल्प ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाची  दखल घेऊन सर्व मित्र परिवाराने पुढाकार घेऊन मदत करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने विलास जाधव,बेबी जाधव,अशोक परळकर,अशोक चौरे ,वैभव जाधव,प्रशांत सुटले, रा.यु.जि. प्रा.विद्या जाधव-चौरे, ऍड.विशाखा जाधव,रोहिणी जधव,जयेंद्र (बबलू) चव्हाण ,नारायण डोईजड ,सुमन कुरुंद,गंगा तालखेडकर,अंजनाबाई चौरे,इंदू  चव्हाण  हे सर्व जण मिळून जेवण बनावण्यपासून ते घरपोहच वाटण्याची व्यवस्था करत आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चौकट

गोटू वीर यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत दिली आहे, त्यांच्या सोबत अमरसिंह ढाका, गौतम कांबळे, अनुरथ वीर (मेजर)  आदी उपस्थित होते. आपल्या मदतीचा हात पुढे करून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.
अगदी सामान्य कुटुंबातील संकल्प ग्रुप सदस्यांनी भुकेलेल्यांना घरपोच गरम जेवण देण्याची व्यवस्था सुरु केली. तब्बल वीस दिवसापासून नित्यनियम जेवणाचा डबा दिला जात आहे.जेवणाचा डबा मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.या ग्रुपचे प्रत्येक भुकेलेल्यांना जेवण देण्याची तयारी आहे.मात्र आर्थिक परिस्थिती बिकट परिस्थिती निर्माण करत आहे. प्रामाणिक सेवा देणाऱ्या संकल्प ग्रुपला दानशूरांनी पुढे येऊन मदत केली.तर हा मदतीचा यज्ञकुंड भुकेलेल्यांना जेवण देण्यासाठी कायम तेवत राहू शकेल. दानशूरांनी मदतीसाठी संकल्प ग्रुपच्या प्रोफ.विद्या जाधव यांचा मोबाईल क्रमांक,7517877416  यावर संपर्क साधून मदत करावी.आणि एक वेळ या स्तुत्य उपक्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन कौतुकाची थाप पाठीवर टाकावी.एवढीच या ग्रुपची अपेक्षा आहे.
   तात्काळ  एका फोन वर पेशंट चा नातेवाईकांना,ऊसतोड  कामगारांना  ,व गरजूना डबा दिला जातो.

No comments:

Post a Comment