तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

परळी उपजिल्हा रुग्णालया मार्फत काॅल सेंटरची स्थापना ; सर्दी, ताप व खोकला या फेवरच्या रुग्णाविषयी शंका,तसेच टेलीमेडीसीन 24 तास सेवा उपलब्ध


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी उपजिल्हा रुग्णालयात Fever Clinic ची स्थापना करण्यात आलेली असुन आत्ता काॅल सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. सदरील काॅल सेंटरचा मोबाईल क्रमांक 9356788467 हा असुन या सेंटरमध्ये 24 तास सेवा सर्दी, ताप व खोकला या रुग्णाविषयीच्या शंका, तसेच टेलीमेडीसीन द्वारे तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला व उपचार देण्यात येणार आहे, रुग्णांना दवाखान्यात येण्याची गरज नसुन घरबसल्या संपर्क साधु शकतात. ही सेवा सर्व परळी शहर व तालुक्यातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. तरी या सुविधेचा गरजु रुग्णांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यांनी केले आहे. चला सगळे मिळून कोरोनाशी लढुया व दोन पावले पुढे राहुन कोरोनाला हरवू या असे आवाहन केले.

No comments:

Post a comment