तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

डिग्रस बंधाऱ्यातून 25 दशलक्ष घनमीटर पाणी नांदेड कडे पळविले०सहा गेटमधून पाण्याचा प्रवाह  
०पाच वाजता उघडले गेट दहा वाजता केले बंद 

आरूणा शर्मा
 पालम :-तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला उच्च पातळीच्या डिग्रस बंधारा या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बागायती पिकाची लागवड केली होती परंतु नांदेड शहराला पिण्याचे पाणी कमी पडत असल्याचा पाटबंधारे विभागाने कांगावा करून  सोमवारी 25 दशलक्ष घनमीटर पाणी  नांदेड साठी सोडण्यात आले यावर्षी डिग्रस बंधाऱ्यात 36 दशलक्ष घनमीटर साठा होता त्यापैकी सोमवारी 27 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता सहा गेटमधून 25 दशलक्ष घनमीटर पाणी शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात सोडण्यात आले सकाळी पाच वाजता गेट उघडल्यानंतर पाच तास पाणी सोडून सकाळी दहा वाजता गेट बंद करण्यात आले सहा गेटमधून पाणी उघडताच नदीपात्रातून मोठा प्रवाह विष्णुपुरी प्रकल्पाकडे जात होता त्यामुळे गोदा काठावर बघणारयांची मोठी गर्दी दिसत होती. विष्णुपुरी प्रकल्पात डिग्रस बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पूर्णा व पालम तालुक्यातील बागायती पिकास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे बागायती पिके वाचविण्यासाठी जायकवाडीतून पाणी डिग्रस बंधाऱ्यात सोडण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता के.पी. पोपळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुर्णा व पालम तालुक्यातील बागायतदारांना तीन महिने पाणी पुरेल एवढा डिग्रस बंधाऱ्यात असल्याचे सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले, कार्यकारी अभियंता गव्हाणे, तहसीलदार ज्योती चव्हाण, मंडळाधिकारी मुरकुटे, तलाठी अंकुश राठोड, पालम पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, फौजदार सनो,फौजदार चव्हाण, फौजदार गुट्टे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता के.पी.पोपळे, अनिरुद्ध कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले यावेळी पोलिसांनी  डिग्रस बंधाऱ्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
*पिकाला पाणी कमी पडू देणार नाही
आ. रत्नाकार गुट्टे *

पिकांना पाणी कमी पडू देणार नाही आमदार रत्नाकर गुट्टे 
डिग्रस बंधाऱ्यात यावेळेस 36 दशलक्ष घनमीटर साठा होता त्यापैकी प्रशासनाने 32 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची तयारी केली होती परंतु मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड यांच्याशी चर्चा करून पालम व पूर्णा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व बागायती पिकाला पुरेल एवढे पाणी ठेवून उर्वरित पाणी सोडण्याबाबत चर्चा केली होती. आज प्रशासनाने 25 दशलक्ष घनमीटर पाणी सोडून बंधाऱ्यात 11. 11 दशलक्ष घनमीटर पाणी ठेवण्यात आले आहे. पालम व पूर्णा तालुक्यातील बागायती पिकासाठी दर महिन्याला तीन दशलक्ष घनमीटर पाणी लागणार आहे त्यामुळे सदरील पाणी तीन महिने बागायती पिकाला पुरेल एवढा साठा ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जर बागायती पिकाला पाणी कमी पडले तर जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शेतकऱ्यांच्या बागायती पिकाला पाणी कमी पडू देणार नाही याची ग्वाही देतो.

No comments:

Post a Comment