तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना पंकजाताई व डॉ. खा.प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून शशिकांत मुंडे व गोविंद सोनवणे यांच्या वतीने 260 कुटुंबांना मोफत धान्य व जिवनावश्यक किटचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना डॉ. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे व डॉ. खा.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत मुंडे, गोविंद सोनवणे यांच्या वतीने 260 कुटुंबांना मोफत धान्य व जिवनावश्यक  किटचे वाटप करण्यात आले. 
            देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. त्यामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे.   आज दि.14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे व खा डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून जिवनावश्यक साहित्याचे सोशल डिस्टन्स ठेवून 260 कुटुंबांना मोफत वाटप करण्यात आले. मुंडे बहगींनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात देत आहेत. गोरगरीब, कष्टकरी वर्गाला घरपोंच रेशन तसेच किराणा साहित्य वाटप केले आहे. यामध्ये गरजूंना ३ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी साहित्य वाटप केले जात आहे. अशा कठीण परिस्थितीत मदतीचा हात मिळाल्यामुळे गरजुवंतांना आधार मिळाला आहे. त्यामुळे गोरगरीबांचे चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम पंकजाताई व प्रितमताई यांनी केले आहे. भविष्यातही परिस्थिती. ओढावली तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई व प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे शशिकांत मुंडे यांनी सांगितले. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे युवा नेते शशिकांत मुंडे, गोविंद सोनवणे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष फुलचंद मुंडे, गजानन गित्ते, श्रीनिवास राऊत, राहुल घोबाळे, राहुल गोदाम व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a comment