तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री १२ वाजे पर्यंत जमावबंदी व संचारबंदीचे सुधारित आदेश जारी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार


कोविड१९ च्या आवश्यक उपाययोजनांसह काही सेवा व आस्थापनांना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी


 बीड, (प्रतिनिधी) :-  जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री १२ वाजे पर्यंत नागरी, ग्रामीण तसेच औद्यो‍गिक क्षेत्रात राहूल रेखावार, जिल्‍हादंडाधिकारी बीड यांनी  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्‍वये जमावबंदी  व संचारबंदी सुधारित आदेश जारी केले आहेत. यानुसार काही सेवा व आस्थापनांना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यांनी कोविड१९ च्या आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाने ठरवुन दिलेला किमान चारफूट सामाजिक अंतर राखणे  आवश्यक आहे. 
 राज्‍य शासनाच्या सूधारीत सूचनेनूसार 20 एप्रिल ते दिनांक 3 मे 2020 पर्यंत अंमलात असणारे निर्देश दिल्याने पुर्वी घोषित केलेल्या नियमावलीसह पुढील नियमावली आणि उपाययोजना लागू करीत आहे. या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक राहील.  पूर्वी कामे चालू ठेवण्यास शिथीलता दिलेल्या वेळेत  कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांनी घरातच राहावे. पूर्वीच्या आदेशाने 3० एप्रिल 2020 पर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले होते त्यात 3 मे 2020 पर्यंत वाढ झाली आहे. या आदेशामध्ये अत्यावश्यक कामासाठी बाहेर येताना सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत असे सूचित केले आहे. परिशिष्‍ट – 1 नुसार राष्‍ट्रीय निर्देशाची अंमलबजावणी  व परिशिष्‍ट  - 2 नुसार सर्व कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्‍ये खालील उपाय योजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.
आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती,संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल.

No comments:

Post a comment