तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू राहणार


हिंगोली,दि.14:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनता व त्‍यांचे आरोग्‍यास धोका असल्‍याने त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू आले होते. परंतू सदरचा कालावधी आता हा दि. 03 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दि. 15 एप्रिल, 2020 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 30 एप्रिल, 2020 च्या 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत (5) पाच व त्‍या पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी जमण्‍यास किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

या आदेशान्वये हिंगोली जिल्‍ह्यात सांस्‍कृतिक, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण, उत्‍सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्‍पर्धांना मनाई करण्यात येत आहे. तसेच खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्‍प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, देशातंर्गत व परदेशी सहली इत्यादीचे आयोजन करता येणार नाही. तसेच जिल्‍ह्यात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येतील असे सर्व दुकाने/सेवा आस्‍थापना, उपहार गृहे / खाद्यगृहे / खानावळ, शॉपींग कॉम्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब/पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्‍यायामशाळा, संग्रहालय तसेच सर्व प्रार्थनास्थळे (उदा. मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणांशिवाय येण्‍यास मनाई करण्यात येत आहे.

सदरील आदेश खालील बाबीकरीता लागु होणार नसून, यामध्ये शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / अस्‍थापना, अत्‍यावश्‍यक सेवेतील व्‍यक्‍ती, रुग्‍णालय, पॅथॉलॉजी-लॅबोरेटरी, दवाखाना सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (अॅलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी), नर्सिंग कॉलेज, रेल्‍वे स्‍टेशन, एस. टी. स्‍टॅण्‍ड, परिवहन थांबे व स्‍थानके, रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप तसेच अंत्‍यविधी (कमाल 10 व्‍यक्‍तीपुरता मर्यादित राहिल), अत्‍यावश्‍यक किराणा सामान, दुध/दुग्‍धोत्‍पादने, फळे व भाजीपाला, औषधालये अशा जीवनावश्‍यक वस्‍तु विक्रीची ठिकाणे उपहारगृहांना योग्‍य ती सर्व खबरदारी घेवुन त्यांना खाद्यपदार्थ बनविणे, तसेच पार्सल स्‍वरुपात काऊंटर व इतर मार्गानी विक्री/वितरीत करण्‍यास परवानगी राहणार आहे. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्‍तव्‍यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्‍यविषयक आवश्‍यक ती खबरदारी घेवुन रेस्‍टॉरंटमध्‍ये खाद्यपदार्थ बनवुन देण्‍यास परवानगी राहिल. ज्‍या आस्‍थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्‍यांच्‍याकडे देश व परदेशातील अतिमहत्‍वाच्‍या (Critical-National & International Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे. व सदर आस्‍थापना बंद राहिल्‍याने अशा उपक्रमांच्‍या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहु शकतील. (परंतू यादृष्‍टीने सदर आस्‍थापना कार्यरत ठेवण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात विशेषरित्‍या कळविणे बंधनकारक आहे.) तसेच प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टि.व्ही. न्‍युज चॅनेल इत्यादी) कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लीपकार्ट, इ. सेवा सुरु राहतील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.  उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्यथ्‍वस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्‍वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्‍यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्‍यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्‍टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

वृत्त क्र.     106

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजी आणि

किराणा माल दुकाने सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर


·   दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश


हिंगोली,दि.14: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत आहे. त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 संचारबंदीचे  आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदीकरीता नागरिक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या संपुर्ण भागामध्ये खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी  ठरवुन दिलेल्या ठिकाणी खालीलप्रमाणे नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकतील. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणा माल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.


अ.क्र.

दिनांक

वार

वेळ


1

15/04/2020

बुधवार

   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत


2

17/04/2020

शुक्रवार

3

19/04/2020

रविवार

4

21/04/2020

मंगळवार

5

23/04/2020

गुरुवार

6

25/04/2020

शनिवार

7

27/04/2020

सोमवार


8

29/04/2020

बुधवारसामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही.

 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा टोल फ्री क्र. 100 वर संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     


****

वृत्त क्र.     107

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बि-बियाणांची दुकाने व

परवानाधारक कृषि केंद्रे सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर


·   दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश


हिंगोली,दि.14: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

खरीब हंगाम हा जवळ येत आहे व व्यापा-यांना खते व बियाणेचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी महत्वाचे साहित्य जसे की, ड्रीप, स्पिंकलर व पाईप पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे करीता ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवाना धारक कृषी केंद्र उघडणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.

अ.क्र.

दिनांक

वार

वेळ


1

15/04/2020

बुधवार
   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत


2

17/04/2020

शुक्रवार

3

19/04/2020

रविवार

4

21/04/2020

मंगळवार

5

23/04/2020

गुरुवार

6

25/04/2020

शनिवार

7

27/04/2020

सोमवार


8

29/04/2020

बुधवारआदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षावर किंवा टोल फ्री क्र. 100 वर संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     


****


वृत्त क्र.     108

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील सिमा राहणार बंद


हिंगोली,दि.14:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीक ही हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरीक, प्रवासी यांचेमार्फत करोना विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना (कोवीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याकरीता जिल्हा सिमा बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरातुन जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

वरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी व अत्यावश्यक सेवा यांचेसाठी लागु राहणार नाहीत. सदरील आदेश दि. 15 एप्रिल, 2020 ते दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


****

वृत्त क्र.     109


कोरोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील

सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा,नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश


             हिंगोली,दि.14: शासनाने कोरोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

            कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याने अनेक लोकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 5 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

आदेश बहुसंख्य व्यक्तींपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालूका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.


****

वृत्त क्र.     110

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालीका, नगरपंचायत, स्थानिक

स्वराज्य संस्थानी अत्यावश्यक व मुलभूत स्वरुपाची कामे पुर्ण करावीत

-जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


हिंगोली,दि.14: आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील पोट कलम 2(3) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर नियमावली अन्वये जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केले आहे. तसेच आरोग्य विभागाने जाहीर केल्या प्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे इतर लोकांनी संपर्कात येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन आदेश जारी केले आहेत. 

कोरोना विषाणूच्या साथ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढात असल्याने आपत्तकालीन उपाय योजनेचा भाग म्हणून केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 10 (2) अन्वये संपुर्ण देशभरात मार्गदर्शक सुचना, आदेश लागु केले आहेत. या अनुषंगाने नागरिकांची गर्दी होऊ नये, आणि परस्पर संपर्क होऊन संसर्ग वाढु नये याकरीता जमावबंदी आदेश लागु केले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या विभागांकडे अत्यावश्यक व मुलभूत सेवा आहेत त्या विभागांना त्या सेवा संचालनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत असे संबंधित विभागांनी कळविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अत्यावश्यक स्वरुपाची कामे पुर्ण करण्यासाठी खालील निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व नगरपालीका, नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण कामकाज, सांडपाणी व्यवस्थापन व पावसाळ्यापूर्वीची सर्व दुरुस्तीचे कामे तसेच ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्ते दुरुस्ती करणे.  

सद्यस्थितीतील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सदरची कामे तात्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे, सबब प्रलंबीत कामे तात्काळ पुर्ण करुन घेण्यात यावीत. जेणेकरुन अत्यावश्यक सेवा कोलमडणार नाही. तसेच संबंधीत विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी यांना असेही निर्देश देण्यात येत आहे की, त्यांनी उपरोक्त नमुद अत्यावश्यक सेवेसाठी नमुद अधिकारी, कर्मचारी आणि वाहने या कामी नेमणूक करुन त्याप्रमाणे आदेश आपले स्तरावरुन काढावेत. सादर आदेशाची प्रत पोलीस विभागाकडे द्यावी आणि सर्व नियुक्त अधिकारी /कर्मचारी यांना सोबत आदेशप्रत आणि कार्यालयाचे ओळखपत्र सोबत बाळगण्यासाठी सूचना द्याव्यात.

तसेच उपरोक्त विभाग /संस्था यांनी कोवीड-19 या विषाणू संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी, व सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेत आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेला आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 तसेच भारतीय दंड संहिता (1960 चा 45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानन्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments:

Post a comment